________________
(२२१)
भाव जडासंबंधी असो किंवा चेतनासंबंधी असो. तीन लोकासंबंधी असो
किंवा परमाणुसंबंधी असो,
FARNA
ज्यामळे क्रोध, मान, माया, लोभ उत्पन्न होतात ते सर्व परिग्रहच आहेत. करणासाठी शरीर असणं आवश्यक आहे, पण फक्त शरीरावर अतिममत्व भाव असेल तर शरीरसुद्धा परिग्रह आहे.
आत्म्याच्या उन्नत अवस्थेपर्यंत पोहोचण्यास परिग्रह हे बन्धन आहे. त्यामुळे पन्हा-पुन्हा चतुर्गती संसारात भटकावे लागते. उर्ध्वगती मिळू शकत नाही.
परिग्रह दोन प्रकारचे १) ब्राह्य आणि अभ्यंतर५४
अभ्यंतर परिग्रहात मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय इत्यादी येतात. यांची उत्पत्ती मनात होते. ज्या परिग्रहाचा मन किंवा हृदयाशी संबंध आहे आणि ते विचाररूप आहेत ते अभ्यंतर परिग्रह होत.
wesomeonehtaniwomanenge
बाह्य परिग्रहाचे दोन भेद आहेत - जड आणि चेतन. ज्यांच्यात प्राण नाही ते जड पदार्थ, जे निर्जीव आहेत. उदा. वस्त्र, पात्र, सोने, चांदी घर इत्यादी. चैतन्य म्हणजे मनुष्य, पशुपक्षी, पृथ्वी, वृक्ष इत्यादी सर्व सजीव पदार्थ. मनुष्य बाह्य व अभ्यंतर परिग्रहाने युक्त आहे.
हा संसार जड आणि चैतन्याच्या संयोगाने बनलेला आहे. ह्या पदार्थांना प्राप्त करण्यासाठी मनुष्य सतत प्रयत्न करीत असतो. आणि मग त्या वस्तूंच्या संरक्षणाच्या चिंतेत सतत बुडालेला असतो. ही जी भावना ती आहे परिग्रहानुबंधी भावना.
बाह्य परिग्रह नऊ प्रकारचे आहेत. धन, धान्य, क्षेत्र, वास्तुद्विपद, चौपद, हिरण्य, सुवर्ण, कुवियधातू इत्यादी. ह्याचे अतिक्रम व अतिचार आहेत. मनुष्य ह्या बाह्य पदार्थामध्ये सर्वात अधिक ममत्व असते ते कंचन कामिनीमध्ये. कंचन म्हणजे सोने. जड पदार्थात सोन्याचा समावेश होतो आणि कामिनी म्हणजे स्त्री. यात सर्व चैतन्य पदार्थांचा समावेश होतो.
HTRA
बाह्य परिग्रहाचे व्यवहारात अधिक प्राधान्य आहे. परंतु बाह्य परिग्रहाचा आधार आभ्यंतर परिग्रह आहे.
आभ्यंतर परिग्रहावरील ममत्व जेव्हा कमी होईल, निदान कमीत कमी मिथ्यात्व । पारग्रह जरी दर झाला तरच माणसाला समज येईल की वस्तु. विचार व कार्य हे