________________
(२१८)
कामभोगासारखा दुसरा शत्रू नाही. दुसरी व्याधी नाही. संसारभ्रमणाचे मूळ कारण
की आहे. जो या चिंतनात गुंततो मोक्षद्वारापर्यंत जाऊच शकत नाही. मार्गातील सर्वात मोठा अडसर विषयासक्ती आहे.
मर्याचा फणा जसा भयानक वाटतो त्याचप्रमाणे विषयभोग भयंकर असतात. माणसाला वाटते, अमुक वयापर्यंत भोग भोगून घ्यावे तृप्त होऊन जावे. परंतु कधीच वृद्ध होत नाही. माणूस वृद्ध झाला तरी वासना कधीच तृप्त होत नाहीत. इंधन टाकले की ती भडकते तशाचप्रमाणे विषयविकारांच्या अग्नीत तृष्णारूपी टाकत राहिलो तर अग्नी कधीच शांत होणार नाही. हीच स्थिती भोग भोगणाऱ्यांची
आहे.
भोग किंपाक फळासारखे आहे. किंपाक फळ दिसायला अतिशय सुंदर, आकर्षक असते पण ते फळ खाल्ले की माणूस तत्काळ मृत्यू पावतो. ह्याचप्रमाणे कामवासनाचे फळ अतिशय दुःखदायक आहे. म्हणून त्यात आसक्ती ठेवू नये.४६ ब्रह्मचर्य व्रताचे पाच अतिचार आहेत.
१) इत्वरपरिगृहीतागमन - नेहमी पुरुषांच्या सहवासात राहण्याचा जिचा स्वभाव असतो तिला इत्वरी म्हणतात. परिगृहिता म्हणजे जिचा एक पती आहे. इत्वर परिगृहीतागमन म्हणजे काही वेळा पुरता पर-स्त्रीचा स्वीकार करणे, भोग उपभोग घेणे.
____२) अपरिगृहीतागमन - जी स्त्री वेश्या किंवा व्यभिचारिणी आहे, जिचा एक पुरुष स्वामी नाही ती अपरिगृहीत स्त्री. एका पुरुषाच्या अधिकारात, आज्ञेत नाही अशा खीचा उपभोग करणे म्हणजे अपरिगृहीता गमन आहे.
३) अनङ्गक्रिडा - निसर्गाच्या विरुद्ध जाऊन अस्वाभाविकपणे काम सेवन करणे म्हणजे अनङ्गक्रीडा.
४) परविवाह करणे - इतरांच्या विवाह घडवून आणण्याच्या कामात मध्यस्थी करणे.
५) कामभोगतीव्र अभिलाषा - विषय वासनेची तीव्र अभिलाषा करणे. ४७ वरील सर्व दोष मैथुन भावनेने लागतात. यापासून दूर राहणे, साधकाचे कर्तव्य
आहे.
या संसारात दहा प्रकारचे अब्रह्म महादुःखाचे कारण आहेत.