________________
(२०८)
ही करणारे, जुगारी, व्यभिचारी, स्त्रियांचे अपहरण करणारे. असत्य
बोलल्याशिवाय राहूच शकत नाही.
मध्या मताला मानणारे आणि त्यागींचा वेष धारण करणारे सुद्धा असत्यभाषी कर्जदाराला सुद्धा असत्य बोलावे लागते. सावकार पैसे मागत असताना कर्जदाराकडे पैसे नसतील तेव्हा ते खोटी आश्वासने देतात की एक आठवड्यानंतर एक महिन्यानंतर देईन. अशाप्रकारे असत्यापासून वाचायचे असेल तर वरुण घ्यायचे
आणि घ्यावेच लागले तर आवश्यकतेनुसार फारच थोडे घ्यावे म्हणजे ते कर्ज जपणे फेडू शकू. असत्याच्या पापापासून वाचण्यासाठी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे.
_भगवती आराधनेमध्ये असत्याचे वर्णन करताना श्री शिवाचार्य असे लिहितात की- मर्मच्छेदक कठोर वचन, उद्वेगकारी कटुवचन, वैरोत्पादक, कलहकारी, भयोत्पादक आणि अवज्ञाकारी वचने अप्रिय वचन आहेत. तसेच हास्य, भय, लोभ, क्रोध, द्वेष इ. कारणांनी बोलले जाणारे वचन असत्य आहे. याचा साधकाने प्रयत्नपूर्वक त्याग केला पाहिजे.२९
जे वचन स्वतःला व दुसऱ्याला संताप उत्पन्न करणारे आहे ते वचन जसेच्या तसे म्हणजे सत्य जरी असले तरी असत्यच आहे.३०
इथे लेखकाच्या सांगण्याचा हा आशय आहे की जे वचन बोलले जाते ते संताप उत्पन्न करणारे असेल तर असत्यच असते. जसे कोढीला कोढी आंधळ्याला आंधळा सांगणे. _ ह्या सर्व असत्य व वचनामागे कषाययोग असल्याने असत्य वचनाने सुद्धा हिंसा
होते
। आज लोक सत्यनारायणाची पूजा करतात. परंतु त्याचा अर्थ त्यांना समजत नाही. जोपर्यंत सत्याचे आचरण केले जात नाही तोपर्यंत सत्यनारायणाला प्रसन्न केले जाऊ शकत नाही. 'सच्चं खु भगवं' सत्यच भगवान आहे.
उत्तराध्ययन सूत्रात असत्याचा परिणाम काय होतो हे लिहिले आहे, "मोसस्स पच्छाय पुरत्थओय पओग्गकाले य दुही दुरन्ते३१ ।।
असत्य बोलण्यापूर्वी व पश्चात तसेच बोलतानाही मनुष्य दुःखी होतो व त्याचा