________________
(२०३)
आज सर्वात मोठी सो अथवा करणेच्या विकासाचे,
ति मोठी समस्या हीच आहे की शिक्षणाबरोबर संवेदनशीलता, प्रेम, करुणेच्या विकासाचे संस्कार जुळलेले नाहीत.
गत मस्तिष्काची रचना फार गुंतागुंतीची आहे. ती समजल्याशिवाय सोचा विकास होऊ शकणार नाही. घृणेचे केंद्रसुद्धा आपल्या मस्तिष्कात आहे
डा आता ज्याला बळ मिळेल ते पुष्ट होईल, ज्याला बळ मिळणार नाही
में दुर्बल होईल.
तीवर संशोधन करणारे वैज्ञानिक सांगतात की स्मृतीचे रसायन अत्यंत अद्भुत
सायनाला हजार वेळा बळ दिले तर ती पुष्ट होते, बळ दिले नाही तर दुर्बल राहते आणि विस्मृतीची मात्रा वाढत जाते.
ज्याप्रमाणे दोन मुले असतील तर त्यातील एकालाच प्रेम दिले तर तो धष्ट, पुष्ठ आणि ज्याला प्रेम दिले नाही तो सुकून जातो. येथे प्रश्न पोषण मिळण्याचा आहे. आम्ही त्या केंद्राला पल्लवित केले तर नक्कीच घृणा कमी होऊन प्रेम भावनेचा विकास होईल.
प्रेम मैत्री आणि संवेदनशीलता वाढविण्याचे उपाय प्रेक्षाध्यानाचा एक प्रयोग आहे. यात ज्योतिकेंद्राचे जर ध्यान केले आणि पुन्हा पुन्हा निरीक्षण करून अनुभव घेतला तर प्रेम, मैत्री आणि करुणेची भावना वाढेल.
आज आम्ही पाणी घालत आहोत ते घृणेच्या रोपट्याला आणि मजेत राहण्याची, शांत राहण्याची इच्छा करत आहेत. रामराज्याची कल्पना करतो आणि प्रत्यक्षात मात्र रावणराज्याचे कार्य चालू असल्यावर कशी बरे त्यांची संगती होणार ? अशा विसंगतीत जगताना आम्ही जीवनाचा विकास साधू शकणार नाही. खरोखर आमची इच्छा जर सामाजिक उन्नतीची असेल तर प्रयत्न व कार्य तसेच केले पाहिजे.
अहिंसेची चर्चा हजारो वर्षांपासून होत आहे. त्याची आवश्यकता आजही आहे, तरीही त्याचा विकास होत नाही. याचे मुख्य कारण आहे आमचे दुर्बलत्व. आज हिंसेमागे जेवढी मानवीय शक्ती खर्च होत आहे त्याच्या एक टक्कासुद्धा शक्ती अहिंसेसाठी खर्च होत नाही. आमची इच्छा अहिंसेची आहे आणि संपूर्ण शक्तीचे नियोजन हिंसेसाठी होत आहे. किती विरोधाभास आहे हा ! मनुष्य शांतीने राहण्याची इच्छा करतो आणि सर्व क्रिया अशांती निर्माण करणाऱ्या करीत असतात. ह्याचे कारण म्हणजे लहानपणापासूनच आपल्यावर वेगळ्या प्रकारचे संस्कार होत आहेत.