________________
(२००)
आज जगातील लोक पशु-पक्ष्यांची हत्या होऊ नये म्हणून अत्यंत प्रयत्नशील न तो मनुष्यांचे रक्षण करू शकत नाही. किड्यामकोड्याची दया करतात. परंतु की कदर करीत नाहीत. त्याची ती अहिंसा रूढी मात्र आहे.२२
मनकतांग सूत्रामध्ये सुद्धा हिंसेचे वर्णन करताना असे सांगितले आहे की धर्माच्या बाला समजणाऱ्या पुरुषाने पापापासून स्वतःला निवृत्त केले पाहिजे. हिंसेने उत्पन्न कर्म उत्पन्न करतात, महाभयदायक आणि दुःखदायक आहेत म्हणून हिंसा कधीही करू
नये.२३
आज मांसाहार जे करीत नाहीत त्यांना कोणी लाख रुपये दिले तरी मांस खाणार नाहीत. परंतु खोटे बोलून दोन पैसे जरी मिळत असतील तर पटकन असत्य बोलले जाते. ही भावहिंसाच आहे.
जीवनात भावहिंसा सुद्धा कर्मबंधाचे कारण ठरते. आपण मुंगीचे रक्षण करतो आणि केलेच पाहिजे. परंतु मनुष्याची रक्षा होऊ शकत नाही. मनुष्याचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
अहिंसेचे पाच अतिचार आहेत. त्यात प्रथम आहे कोणत्याही प्राण्याला बांधणे दोष आहे- त्या अगोदर मनुष्याने विचार करायला पाहिजे की आपल्या नोकरांना आपण बांधत तर नाही ना ! एखादा मनुष्य गरीबीमुळे नोकरी करतो परंतु त्याच्या गरीबीचा आपण दुरुपयोग केला तर ती सुद्धा हिंसा आहे. नोकरांजवळून सहा तासाऐवजी दहा तास काम करवून घेतले तर हे सुद्धा एकाप्रकारचे बंधन आहे. म्हणून केवळ पशूला बांधणेच हिंसा नसून मनुष्याला बंधनात ठेवणे ही सुद्धा हिंसाच आहे.
_ दुसरा अतिचार वध म्हणजे मारणे. पशूप्रमाणे मनुष्याला मारणे सुद्धा अतिचार आहे.
तिसरा अतिचार छविच्छेद म्हणजे कोणाच्याही चामडी, शेपूट अथवा अंगोपांगांचे छेदन करणे. आज स्वस्वाथ्यासाठी पैसे देऊन किडनी इत्यादी अवयव घेतले जातात, कित्येक गरीब आपले शरीर विकून जगतात तर कित्येक डॉक्टर ऑपरेशन करताना मनुष्याच्या मृत्यूची भीती न बाळगता त्यांचे चांगले अवयव काढून घेतात. हे कित्येक वळा पेपरात वाचावयास मिळते. पैशासाठी मनुष्य हिंसक कृत्ये करतात. ह्यापासून दूर राहिले पाहिजे.