________________
णे मारणे, प्राणांचा अतिपात करणे म्हणजे त्याग करणे किंवा वियोग करणे, देहांतर संक्रमण करणे आणि प्राणांचे व्यपरोपण करणे ह्या सर्व
करणे, प्राणांचा वध करणे देहांत शब्दाचा एकच अर्थ होतो.१३
मत्त योगाने हिंसा होते' हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. अप्रमत्त दशेत कम लागत नाही. जो साधू इर्यासमितिपूर्वक पाय उचलल्यावर चालण्याच्या ठिकाणी
भद प्राणी त्याच्या पायाखाली दबून मेला तरी त्या हिंसेने त्याला बंध होत पाप लागत नाही आणि जीव मरो वा जगो तरी प्रमादयुक्त यत्नाचाराने रहित पुरुषाला न हिंसा होते व यत्नाचाराने युक्त प्रवृत्ती करणाऱ्याला हिंसा झाली तरी बंध होत
जहाशा
हिंसेचे चार भेद आहेत - १) स्व-भाव प्राण हिंसा, २) स्व-द्रव्यप्राण हिंसा, ३) पर भाव प्राण हिंसा, ४) परद्रव्य प्राण हिंसा.
जेव्हा एखाद्या जीवामध्ये काया, वचन, मन यांच्या योगाने क्रोधादी कषाय उत्पन्न होतात तेव्हा त्या जीवाचा सर्वप्रथम शुद्धोपयोगरूपी शुद्धात्म स्वरूपाचा घात होतो. ह्याला स्व-भाव प्राण हिंसा म्हणतात. यानंतर जर कषायाचे तीव्र स्वरूप झाले व जीव आपल्या हातापायाने स्वत:च्याच अवयवांना कष्ट देऊ लागला किंवा आत्महत्या करून घेतली तर ही स्व-द्रव्य प्राण हिंसा आहे.
कषाय योगाने एखाद्या अन्य जीवाला कवचन सांगितले किंवा असे काही कार्य केले की ज्यामुळे दुसऱ्याचे अंतरंग पीडित होऊन कषायरूपी परिणाम झाला तर ही परभाव प्राण हिंसा आहे. तसेच जर कषायवश दुसऱ्याच्या शरीराला पीडा दिली किंवा त्यांच्या प्राणांचा नाश केला किंवा स्वतःच स्वतःचा आत्मघात करून घेतला तर ही पर द्रव्य प्राण हिंसा आहे.
वास्तविक राग इत्यादी भाव प्रकट होणेच हिंसा आहे. द्वेष, मोह, काम, क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, शोक, जुगुप्सा (घृणा), प्रमाद इत्यादी रागाचे अनेक भेद आहेत.१५
निस
हिंसा तीन कारणांनी होते. १) आरम्भजा, २) विरोधना, ३) संकल्पजा
आरम्भजा हिंसा - कृषी, रक्षण, व्यापार, शिल्प आणि आजीविकेसाठी जी हसा केली जाते ती आरम्भजा हिंसा आहे. गृहस्थ आपल्या स्वतःच्या आणि परिवाराच्या भरण-पोषणासाठी आजीविका मिळवितो ती सर्वथा अहिंसक नसते. जेथे कर्म तेथे हिंसा