________________
(१६४)
दुर्गंधयुक्त अपवित्र आणि नश्वर आहे. अशाप्रकारे विचार केल्याने आणि त्याचे रूप पाहून हे जाणले पाहिजे की हे शरीर अध्रुव, अनित्य, अशाश्वत आणि धर्मी आहे. अशाप्रकारे एकशेदोन सूत्रांपासून एकशे बेचाळीस सूत्रांपर्यंत शरीराच्या रचनेचे, अनित्यतेचे आणि अशुचितेचे विस्तृत विवेचन केले आहे. ११०
आगम वाङ्मयामध्ये भावनेसंबंधी वेगवेगळ्या प्रसंगी जे वर्णन आले आहे त्याचे थोडक्यात विवेचन केले आहे. ह्या वर्णनामध्ये मुख्यरूपाने दोन गोष्टी आपल्या समोर उशात एकतर बारा भावनेच्या रूपात जसे सुव्यवस्थित, क्रमबद्ध विवेचन आपल्याला प्राप्त हे तसेच आगमामध्ये क्रमबद्ध विस्तृत विवेचन नाही. जे काही प्राप्त होते ते सांकेतिक अत आहे. म्हणून अनित्यत्व, अशरणत्व इत्यादींच्या अतिरिक्त अन्य भावना प्रकट सात व्यवस्थित दृष्टिगोचर होत नाहीत. अन्य वेगवेगळ्या प्रसंगी आलेल्या वर्णनामध्ये त्याचे सांकेतिक भावरूपात आपण वर्णन करू शकतो.
दुसरी गोष्ट ही आहे की अशुभ अथवा अप्रशस्त आणि शुभ अथवा प्रशस्त भावांच्या आधारे भावनेचे वर्णन केलेले आहे तेथे चिंतनमूलक मुख्य अशुभ आणि शुभ पक्षाला स्वीकारले आहे. साधकाने प्रथम अशुभाचे चिंतन करून त्याचा परित्याग केला पाहिजे. त्यानंतर शुभाचे चिंतन करून त्याचे ग्रहण केले पाहिजे.
म्हणून ह्याच्या पुढच्या प्रकरणात अशुभ भावनेचे विवेचन केले जाईल. अशुभला जाणून त्याचा परित्याग केल्याशिवाय शुभ भावनेने ओतप्रोत होऊ शकणार नाही. जर शुभ भावनेने भावित व्हायचे असेल तर सर्व प्रथम अशुभ भावनेला साफ करावे लागेल. कोन्या पाटीवर लिहिले जाते भरलेल्या पाटीवर कसे लिहू शकणार ? त्याचप्रमाणे अंतरात्मा कोरा स्वच्छ असला तरच शुभ अथवा शुद्ध भावना त्यात राहू शकते त्याच्यासाठी प्रथम अशुभ भावनेचे वर्णन केले जाईल. त्याची परिहेयता, त्याचे फळ इत्यादीचे विवेचन केले