________________
(१२९)
अपनेचे पुन्हा पुन्हा चिंतन करणे, अनुशीलन करणे आवश्यक आहे. भ33
। "सच्चस्स आणाए से उवट्ठिए मेहावी मार तरति"१४
याच्या आज्ञेत राहणारा मेधावी (बुद्धिमानी) मार म्हणजे मृत्यू तरून जातो. विजय प्राप्त करतो. अशाप्रकारे सत्याच्या महत्त्वाला समजून सत्यावर खरी निष्ठा ी पाहिजे आणि त्यासंबंधी सतत चिंतन केले पाहिजे तरच सत्य महाव्रत दृढ होते.
अनुविची म्हणजे सत्याच्या विविध पक्षांवर पुन्हा पुन्हा चिंतन करून बोलणे. च्या गुणदोषांचा विचार करून जे दोष आहेत त्यांना सोडून देऊन गुणात्मक भाषेचा प्रयोग करावा.
२) क्रोध निग्रहरूप क्षमाभावना - क्रोधाच्या कटू फळाला जाणून त्याचा त्याग करावा कारण क्रोधावेशामध्ये असत्याचा प्रयोग होऊ शकतो. जो क्रोधाचा त्याग करतो तोच निर्ग्रन्थ आहे.१५ कारण क्रोध पापवृत्तीमध्ये मुख्य आहे म्हणून त्याज्य आहे. परंतु जोपर्यंत हे शरीर आणि संसार आहे तोपर्यंत मानवामध्ये अशा अनेक कमतरता गाइतात, ज्या त्याला पापमार्गाकडे प्रवृत्त करतात. सर्वांची इच्छा क्रोधाचा त्याग करण्याची असते. परंतु जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा कित्येक लोक क्रोधामुळे आपले संतुलन गमावून बसतात. अशा परिस्थितीतून वाचण्यासाठी साधकाने आपल्या मनात असा दृढ़ संकल्प करावा की, ज्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही क्रोधाधीन न होता क्षमा धारण करु शकेल, पराभूत होणार नाही. मन हे क्षमाभावनेने युक्त असावे. क्रोधावर विजय मिळविण्यासाठी त्याच्या अनिष्ट परिणामांचे नेहमी चिंतन करणे आवश्यक आहे. क्रोधाचा त्याग करून क्रोध निग्रहरूप क्षमा भावनेचे चिंतन केले पाहिजे.
३) लोभ निग्रहरूप निर्लोभ भावना - जो साधक लोभाच्या दुष्परिणामाला समजून त्याचा परित्याग करतो तो निर्ग्रन्थ आहे. कारण केवली भगवान सांगतात की, साभी व्यक्ती लोभाच्या भरात असत्य बोलते. परंतु सत्याचा आराधक त्याच्या स्वरूपाला जाणून त्याचा त्याग करतो.१६
लोभ' ही मनुष्याची दुर्बल, हीनवृत्ती आहे. ती मनुष्याला सत्यापासून दूर करते. सा प्रश्न उपस्थित होतो की, महाव्रती साधकालासुद्धा लोभ असू शकतो का ? समाधान अत्यंत सोपे आहे. लोभ तत्त्वतः पदार्थात नाही. मनोगत आहे. तो केवळ
पान, स्थान, वस्त्र इत्यादींच्या प्राप्तीवरच सीमित नाही. तो मुख्यत: एषणेशी
संबंधित आहे.