________________
S
(९७)
कोणाचा नाही.
संसार एक विशाल महासागर आहे. त्यात मानव स्वतःच्या पूर्वजन्माच्या निसार येथे एकत्रित येतात आणि ऋणानुबंध पूर्ण झाले की आपल्या आपल्या वाटेने निग्न जातात. CAVE
मोह, माया आणि आसक्तीमुळे संसारी व्यक्ती असे समजते की जगात मी एकटाच नाही माझे कुटुंब, नातेवाईक, मित्र सर्वजण माझ्याबरोबर आहेत. परस्परांच्या सम्बटःखात सहयोग देणारे आणि बरोबर राहणारे आम्ही एकटे कसे असणार ? अशाप्रकारे मोहामध्ये व्यक्ती संसारी संबंधांना अधिकाधिक घनिष्ट करत जात आहे. पण तो हे विसरतो की है सर्वजण स्वार्थवश माझ्याकडे येतात. जर त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला नाही आणि माझी परिस्थिती बिकट झाली तर मला कोणीही विचारणार नाही.
संसारामध्ये सर्वजण सुखाचे साथी आहेत, दुःखात कोणी कोणाचा नाही. वास्तविक पाहिले तर प्रत्येकजण एकटाच आहे. एकत्व भावनेचा हा निष्कर्ष आहे.
एकत्व भावना आत्मत्त्वावर आधारीत आहे. ह्याचा अभ्यास सातत्याने केल्याने तो भाव मनामध्ये दृढ होतो आणि व्यक्तीला स्वार्थावर आधारलेल्या संबंधाची सत्यता समजल्याने त्याची दृष्टी बदलते. त्याची दृष्टी जी 'पर' पदार्थावर होती ती स्वतःवरच स्थिर होते. असे झाल्याने दिवसरात्र ज्या सांसारिक इच्छा पूर्ण करण्यामध्ये धावपळ होत होती ती थांबते. तो आत्मोन्नतीचे चिंतन करू लागतो आणि त्या दिशेने पुढे जाण्यासाठी तत्पर बनतो. अशाप्रकारे योग्य मार्गावर आल्याने मनुष्याचे जीवन उज्ज्वल बनते.
एकत्व भावनेचा अभ्यास करण्यासाठी व्यक्तीला अनेक प्रयत्न करावे लागतात. जनसमूहापासून दूर राहावे लागते. संसारात घडणाऱ्या घटनांवर विशेषरूपाने ध्यान द्यावे लागते. स्वार्थी संसाराला सर्वजण पाहतात. परंतु त्याच्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. तो या गोष्टीकडे तेव्हाच लक्ष देऊ लागतो, जेव्हा मनुष्याला ही गोष्ट कळते की तो या जगात साटाच आहे, त्याचे येथे कोणीच नाही. आपलेपणा दाखविणारे, सत्यतः आपल्यापासून खूप लांब आहेत.
शान, दर्शन, लक्षणेने युक्त एक आत्माच शाश्वत आहे. बाकीसर्व संयोगजन्य बाह्य भाव आहेत.४९
स्वजन परिजनच काय ? परंतु हे शरीरही माझे नाही हे सर्व विनाशी आहे. ह्या जातीय एकता आहे. मी अविनाशी आहे म्हणन माझे ह्या विनाशी वस्तूबराबर