________________
- अंगठीची शोभा आहे की अंगठीमुळे बोटाची ? विचार करता करता शेवटी यास पोहचले की अंगठी सुद्धा जड पुद्गल आहे आणि शरीरही पुद्गल आहे. सर्व काही अनित्य आहे. 'मी' तर शरीरात बसलेला नित्य असा आत्मा आहे. माझी शोभा काय ? अशाप्रकारे चिंतन करता करता स्थिर झाले. शुद्धोपयोग स्वभावात रमून गेले आणि प्रक्लध्यानाच्या धारेमध्ये घातीकर्माचा पडदा तुटला केवलज्ञानाची ज्योत चमकू लागली हा अनित्य भावनेचा प्रभाव आहे.
जो अनित्य भावनेचे चिंतन करतो त्याची शरीरादींची आसक्ती सुटते व संयोग आणि वियोगामध्ये हर्ष किंवा शोक होत नाही. मोहाचा त्याग केला जातो, मन विषयसुखापासून विरक्त होते व त्यामुळे उत्तम सुखाची प्राप्ती होते.
अशरण भावना - अनित्यतेचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर त्याला शरण जाणे, त्याचा आश्रय घेणे, त्याच्या आधारावर जीवनाचे अस्तित्व मानणे हा मनुष्यांचा भ्रम आहे. कारण जे पदार्थ स्वतःच अनित्य आहेत, त्यांचा आश्रय अथवा आधार नित्य राहू याणार नाही. जेव्हा स्वतःचे शरीरच शरणयोग्य नाही तर धन, सेवक इत्यादी कसे शरणरूप होऊ शकतील?
आपल्याला दुसऱ्यांची शरण घेण्याची काहीच आवश्यकता नाही. जो दुसऱ्यांना शरण जातो तो रिक्त हस्ताने परत फिरतो. परंतु ह्या संसारात चहूकडे दुःखाच्या ज्वाला पसरल्या आहेत. झोपडीत राहणारे कष्टामुळे उद्विग्न आहेत तर स्वर्णमहालात राहणारे सुद्धा दुखाने त्रस्त आहेत. मानवी हृदय दुःखाच्या ज्वालांमध्ये जळत आहे. मनुष्य असहाय आहे. त्याने कोणाला शरण जावे हा प्रश्नच आहे.
विपरीत परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या मनात सहजच अशी भावना निर्माण होते की त्यांना कोणीतरी वाचवाये, तो कोणाचा तरी आश्रय घेऊ इच्छितो म्हणूनच तो आपल्या कुटुंबाचे मोठ्या आसक्तीने पालनपोषण करतो. तो विचार करतो की पुत्र, मित्र, स्वजनांना
ता केली तर माझ्या वृद्धावस्थेत हे मला सहयोग देतील. परंतु वार्धक्य, रोग आणि मृत्यू वा अशा अवस्था आहेत, की ज्यात व्यक्ती स्वतःला असहाय आणि दुःखी अनुभवतो.
कुटुंबातील लोक प्रेमभावनेने प्रयत्नपूर्वक औषधोपचार करून दुःख दूर करण्याचा पन्न करतात. परंतु रोग दोन प्रकारचे असतात १) दोषज आणि २) कर्मज. आयुर्वेदात
त, कफ हे तीन दोष मानले आहेत. 'दोषसाम्यमरोगिता' ह्या तीन दोषांची साम्यता या हेतू आहे. जेव्हा हे विषम होतात तेव्हा व्यक्ती रुग्ण होतो. हे दोषज रोग तर
स्वस्थतेचा हेतू आहे. जेव्हा हे ।