________________
प्रकाशकीय
कलिकालसर्वज्ञ आचार्यदेव श्रीमद् हेमचंद्रसूरीश्वरजी म.सा. च्या ‘प्राकृत व्याकरण' चा मराठी अनुवाद प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे. श्रुतभवन संशोधन केंद्राच्या सन्निष्ठ समर्पित सहकारिगणांच्या कठोर परिश्रमाने दुर्गम असे हे कार्य सम्पन्न होत आहे. या प्रसंगी श्रुतभवन संशोधन केंद्राच्या संशोधन प्रकल्पासाठी दान करणारे दाता मांगरोळ (गुजरात) निवासी श्रीमती चंद्रकलाबेन सुंदरजी शेठ आणि भाईश्री (इंटरनेशनल जैन फाउंडेशन, मुंबई) यांचे तसेच श्रुतभवन संशोधन केन्द्रासोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपाने जोडलेल्या सर्व महानुभावांचे आम्ही हार्दिक अभिनन्दन करीत आहोत. या ग्रंथाच्या प्रकाशनाचा अलभ्यलाभ श्री आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट (गोटीवाला धडा ) यांनी प्राप्त केला आहे. आपल्या अनुमोदनीय श्रुतभक्तीसाठी आम्ही आपले आभारी आहोत.
भरत शाह
(मानद अध्यक्ष )