________________
चतुर्थः पादः
(अनु.) विलप् (या धातू) ला झख आणि वडवड असे आदेश विकल्पाने होतात. उदा. झखइ, वडवडइ. ( विकल्पपक्षी :-) विलवइ.
३००
( सूत्र ) लिपो लिम्प: ।। १४९।।
( वृत्ति) लिम्पतेर्लिम्प इत्यादेशो भवति । लिम्पड़ ।
(अनु.) लिम्पति (लिप्) (या धातू) ला लिम्प असा आदेश होतो. उदा. लिम्पइ.
( सूत्र ) गुप्येर्विर - णडौ ।। १५० ।।
(वृत्ति) गुप्यतेरेतावादेशौ वा भवतः । विरइ । णडइ । पक्षे । गुप्पड़ । (अनु.) गुप्यति ( गुप्) (या धातू) ला (विर आणि गड असे) हे आदेश विकल्पाने होतात. उदा. विरइ, णडइ. (विकल्प - ) पक्षी :- गुप्पइ.
( सूत्र ) क्रपोवहो णि: ।। १५१।।
(वृत्ति) क्रपे: अवह इत्यादेशो ण्यन्तो भवति । अवहावेइ। कृपां करोतीत्यर्थः। (अनु.) कृप् (या धातू) ला प्रयोजक प्रत्ययाने अन्त पावणारा अवह (म्हणजे अवहावे) असा आदेश होतो. उदा. अवहावेइ (म्हणजे) कृपा करतो असा अर्थ आहे.
( सूत्र ) प्रदीपेस्ते अव - सन्दुम - सन्धुक्काब्भुत्ताः ।। १५२।। (वृत्ति) प्रदीप्यतेरेते चत्वार आदेशा वा भवन्ति । तेअवइ। सन्दुमइ । सन्धुक्कइ । अब्भुत्तइ | पलीवइ ।
(अनु.) प्रदीप्यति (प्रदीप्) (या धातू) ला (तेअव, सन्दुम, सन्धुक्क आणि अब्भुत्त असे) हे चार आदेश विकल्पाने होतात. उदा. ते अवइ... अब्भुत्तइ. (विकल्पपक्षी :-) पलीवइ.
( सूत्र ) लुभे: संभाव: ।। १५३।।
(वृत्ति) लुभ्यते: संभाव इत्यादेशो वा भवति । संभावइ । लुब्भइ ।