________________
२३८
तृतीयः पादः
उदा. अम्हेसु...मज्झेसु. (सु प्रत्ययापूर्वी मागील अ चा) ए विकल्पाने होतो या मती मात्र अम्हसु...मज्झसु (अशी रूपे होतील). (सु या प्रत्ययापूर्वी) अम्ह मध्ये (अ चा) आ होतो असे दुसरा एक (वैयाकरण) मानतो; तदनुसार अम्हासु (असे रूप होईल).
(सूत्र) त्रेस्ती तृतीयादौ ।। ११८॥ (वृत्ति) त्रे: स्थाने ती इत्यादेशो भवति तृतीयादौ। तीहिं कयं। तीहिन्तो
आगओ। तिण्हं धणं। तीसु ठि। (अनु.) तृतीया इत्यादि (म्हणजे तृतीया ते सप्तमी पर्यंतच्या) विभक्तीमध्ये त्रि
(या संख्यावाचक शब्दा) च्या स्थानी ती असा आदेश होतो. उदा. तीहिं...तीसु ठिअं.
(सूत्र) द्वेर्दो वे ।। ११९।। (वृत्ति) द्विशब्दस्य तृतीयादौ दो वे इत्यादेशौ भवतः। दोहि वेहि कयं।
दोहिन्तो वेहिन्तो आगओ। दोहं वेण्हं धणं। दोसु वेसु ठिअं। (अनु.) तृतीया, इत्यादि (म्हणजे तृतीया ते सप्तमीपर्यंतच्या) विभक्तीमध्ये द्वि
(या संख्यावाचक) शब्दाला दो आणि वे असे आदेश होतात. उदा. दोहि...वेसु ठिअं.
(सूत्र) दुवे दोण्णि वेण्णि च जस्-शसा ।। १२०।। (वृत्ति) जस्-शस्भ्यां सहितस्य द्वेः स्थाने दुवे दोण्णि वेण्णि इत्येते दो वे
इत्येतौ च आदेशा भवन्ति। दुवे दोण्णि वेण्णि दो वे ठिआ पेच्छ
वा। ह्रस्व: संयोगे (१.८४) इति ह्रस्वत्वे दुण्णि विण्णि। (अनु.)जस् आणि शस् (या प्रत्ययां) नी सहित असणाऱ्या द्वि (शब्दा) च्या स्थानी
दुवे, दोण्णि आणि वेण्णि असे हे (तीन) तसेच दो आणि वे असे हे (दोन) असे आदेश होतात. उदा. दुवे...पेच्छ वा. 'ह्रस्व: संयोगे' या सूत्रानुसार ह्रस्वत्व आले असता दुण्णि आणि विण्णि (अशी रूपे होतात).