________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
२३३
( सूत्र ) तुमे तुम तुमाइ तइ तए ङिना ।। १०१ ।।
(वृत्ति) युष्मदो ङिना सप्तम्येकवचनेन सहितस्य एते पञ्चादेशा भवन्ति । तुमे तुम तुमाइ तइ तए ठिअं ।
(अनु.) सप्तमी एकवचनाच्या ङि (या प्रत्यया) सहित ( असणाऱ्या) युष्मद् (सर्वनामा) ला तुमे, तुमए, तुमाइ, तइ, आणि तए (अस) हे पाच आदेश होतात. उदा. तुमे...तए ठिअं.
( सूत्र ) तु - तुव - तुम - तुह - तुब्भा ङौ ।। १०२ ।।
(वृत्ति) युष्मदो ङौ परत एते पञ्चादेशा भवन्ति । ङेस्तु यथाप्राप्तमेव । तुम्मि । तुमि । तुमम्मि । तुहम्मि । तुब्भम्मि। ब्भो म्हज्झौ वेति वचनात् तुम्हम्मि तुज्झम्मि। इत्यादि ।
(अनु.) ङि (हा प्रत्यय) पुढे असताना युष्मद् (सर्वनामा) ला तु, तुव, तुम, तुह, आणि तुब्भ (असे) हे पाच आदेश होतात. ङि (या प्रत्यया) चे (आदेश) मात्र (सू.३.११ पहा) नेहमीप्रमाणे होतातच. उदा. तुम्मि...तुब्भम्मि. ‘ब्भो म्हज्झौ वा— या वचनानुसार तुम्हम्मि आणि तुज्झम्मि; इत्यादि.
( सूत्र ) सुपि ।। १०३ ॥
(वृत्ति) युष्मदः सुपि परत: तु - तुव - तुम - तुह - तुब्भा भवन्ति । तुसु । तुवेसु । तुमेसु । तुहेसु। तुब्भेसु । ब्भो म्हज्झौ वेति वचनात् तुम्हे तुज्झेसु । केचित्तु सुप्येत्वविकल्पमिच्छन्ति । तन्मते तुवसु तुमसु तुहसु तुब्भसु तुम्हसु तुज्झसु। तुब्भस्यात्वमपीच्छत्यन्यः । तुब्भासु तुम्हासु तुज्झासु। (अनु.) सुप् (हा प्रत्यय) पुढे असताना, युष्मद् (सर्वनामा) ला तु, तुव, तुम, तुह, आणि तुब्भ (असे हे पाच आदेश) होतात. उदा. तुसु...तुब्भेसु. 'ब्भो म्हज्झौ वा' या वचनानुसार तुम्हेसु आणि तुज्झेसु (ही रूपे होतात). सुप् (प्रत्यय) पुढे असताना (त्याच्या मागील अ चा ) ए विकल्पाने होतो, असे काही (वैयाकरण) मानतात; त्यांच्या मतानुसार तुवसु... तुज्झसु ( अशी रूपे होतील). (सु प्रत्ययापूर्वी) तुब्भ मध्ये ( अन्त्य अ चा) आ होतो, असे दुसरा एक (वैयाकरण) मानतो. (तदनुसार) तुब्भासु... तुज्झासु (अशी रूपे होतील).