________________
प्राकृत व्याकरणे
२३१
तुब्भत्तो। ब्भो म्हज्झौ वेति वचनात् तुम्हत्तो तुज्झत्तो। एवं दो-दु
हि-हिंतोलुक्ष्वप्युदाहार्यम्। तत्तो इति तु त्वत्त इत्यस्य वलोपे सति। (अनु.) पंचमी एकवचनाचा ङसि हा प्रत्यय पुढे असताना, युष्मद् (या सर्वनामा)
ला तइ, तुव, तुम, तुह आणि तुब्भ (असे) हे पाच आदेश होतात. ङसि (या प्रत्यया) चे मात्र त्तो, दो, दु, हि, हितो आणि लुके (सू.३.८ पहा) हे आदेश नेहमीप्रमाणे प्राप्त होतातच. उदा. तइत्तो...तुब्भत्तो ; 'ब्भो म्हज्झौ वा' या वचनानुसार तुम्हत्तो आणि तुज्झत्तो. अशाचप्रकारे, दो...लोप यांच्या बाबतीत उदाहरणे घ्यावीत. तत्तो हे रूप मात्र (संस्कृतमधील)
त्वत्त: (या रूपा) मधील व् चा लोप होऊन बनते. (सूत्र) तुय्ह तुब्भ तहिन्तो ङसिना ।। ९७।। (वृत्ति) युष्मदो ङसिना सहितस्य एते त्रय आदेशा भवन्ति। तुम्ह तुब्भ तहिन्तो
आगओ। ब्भो म्ह-ज्झौ वेति वचनात् तुम्ह। तुज्झ। एवं च पञ्च
रूपाणि। (अनु.) ङसि (या प्रत्यया) सहित (असणाऱ्या) युष्मद् (सर्वनामा) ला तुम्ह, तुब्भ
आणि तहिंतो (असे) हे तीन आदेश होतात. उदा. तुम्ह...आगओ. 'ब्भो म्हज्झौ वा' या वचनानुसार तुम्ह, तुज्झ. आणि अशाप्रकारे (एकूण) पाच रूपे होतात.
(सूत्र) तुब्भतुम्होरहोम्हा भ्यसि ।। ९८।। (वृत्ति) युष्मदो भ्यसि परत एते चत्वार आदेशा भवन्ति। भ्यसस्तु यथाप्राप्तमेव।
तुब्भत्तो तुम्हत्तो उय्हत्तो उम्हत्तो। ब्भो म्हज्झौ वेति वचनात् तुम्हत्तो
तुज्झत्तो। एवं दोदुहिहिन्तोसुन्तोष्वप्युदाहार्यम्। (अनु.) भ्यस् (हा प्रत्यय) पुढे असताना युष्मद् (या सर्वनामा) ला तुब्भ, तुम्ह,
उय्ह आणि उम्ह (असे) हे चार आदेश होतात. भ्यस् (या प्रत्यया) चे आदेश मात्र (सू.३.९ पहा) नेहमीप्रमाणे होतातच. उदा. तुब्भत्तो...उम्हत्तो. 'ब्भो म्हज्झौ वा' या वचनानुसार, तुम्हत्तो, तुज्झत्तो. याचप्रमाणे दो, दु, हि, हितो आणि सुंतो यांच्या बाबतीत उदाहारणे घ्यावीत.
A-Proof