________________
प्रकरण ३ : स्वरविकार
४७ दीर्घ ऊ बद्दल येणारे इतर स्वर ऊ = ई : उद्व्यूढ = उव्वीढ (वर धरलेला) ऊ = उ१ : कौतूहल = कोउहल्ल, उलूक = उलुय (घुबड) ऊ = ए : नूपुर = नेउर ऊ = ओ२ : तूणीर = तोणीर (भाता), कूर्पर = कोप्पर (कोपर), तांबूल =
तंबोल, लांगूल = नंगोल (शेपूट), तूण = तोण (भाता), कूष्मांड = कोहंड (कोहळा), स्थूल = थोर.
४८
ए बद्दल येणारे इतर स्वर ए = इ : वेदना = वियणा, देवर = दियर (दीर) ए = ओ : द्वेष = दोस, प्रद्वेष = पदोस ४९ ओ बद्दल येणारे इतर स्वर ओ = उ : उताहो = उदाहु (अथवा) ओ = ए : स्तोक = थेव (थोडा), लोष्ट = लेटु (ढेकूळ) ५० स्वरांचे ह्रस्वीकरण व दीर्धीकरण
कित्येकदा शब्दातील ह्रस्व स्वर दीर्घ केले जातात, तर दीर्घ स्वर
ह्रस्व केले जातात. पुढे सांगितल्याप्रमाणे हा बदल होतो. (अ) दीर्धीकरण
जोर देताना ह्रस्व स्वर दीर्घ केला जातो. तणामवि (तणमवि - तृणं अपि), अणुदिसामवि (अणुदिसमवि - उपदिशांत सुद्धा), अन्नयरामवि (अन्नयरमवि); एवामेव (एवमेव), खिप्पमेव - चट्दिशी, तत्काळ), जामेव (जमेव), तामेव (तमेव), संजयामेव (संजयमेव)
१ म. :- चूडक - चूडा, चूर्णक - चुना २ म. :- कूपर - कोपर, स्थूल - थोर ३ यावेळी प्राय: अवि (अपि) किंवा एव या अव्ययांचा उपयोग असतो.