________________
२७६
आढळतात' आणि आढळणारी ही सर्व रूपे कर्तरिच आहेत. उदा. भविस्सं,
आगमिस्सं, एसमाण.
२७१ विध्यर्थी कर्मणि धातुसाधित विशेषण
पुढील प्रत्ययांच्या साहाय्याने अर्धमागधीत वि.क.धा.वि. सिद्ध केली
जातात.
(१) (अ) अकारान्त धातूंना 'इयव्व' हा प्रत्यय जोडून :
चिट्ठ-चिट्ठियव्व, पुच्छ-पुच्छियव्व, पास-पासियव्व, भिंद-भिंदियव्व, भुंजभुंजियव्व, जाण - जाणियव्व, सुण-सुणियव्व.
(आ) अकारान्तेतर स्वरान्त धातूंना 'यव्व' हा प्रत्यय लावून :पुच्छ-पुच्छे-पुच्छेयव्व, कह-कहे- कहेयव्व; ठा-ठायव्व, ना-नायव्व, दा-दायव्व; मारे-मारेयव्व, परितावे - परितावेयव्व; ने-नेयव्व; हो-होयव्व. (२) अकारान्त धातूंना 'णिज्ज' हा प्रत्यय जोडून
वंद-वंदणिज्ज, अच्च-अच्चणिज्ज, नमंस -नमंसणिज्ज, दरिस - दरिसणिज्ज, पूय-पूयणिज्ज.
२७२ अनियमित वि.क. धा. वि.
पुष्कळ धातूंची वि.क.धा.वि. संस्कृतमधून वर्णान्तराने अर्धमागधीत आलेली आहेत. त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही. त्यातील काही अशी (अ) कर कज्ज पिव पेज्ज, पेय
:
जिण (जि) जेय
भुंज भोज
वज्ज वज्ज (वर्ज्य
दुल्लंघ दुल्लंघ
वय (वद्) वज्ज
आणव आणप्प
खा खज्ज
गाज्ज
भव भव्व
गिह गेज्झ
चय चज्ज
अर्धमागधी व्याकरण
१
२
:
जाय (जन्) जन्न
जाण य
वय (वच्) वच्च
गुह गुज्झ
दुह दोझ,
दुज्झ
भविष्य धातु. वि. सिद्ध करावयाची झाल्यास भविष्यकाळातील धातूंच्या स्सकारान्त अंगांना ‘अंत' व 'माण' हे प्रत्यय जोडून सिद्ध करता येतील. उदा. कहिस्संत, कहिस्समाण. इत्यादी. (याकोबी, Erja, पृ. ४७ ) कधी आकारान्त धातू पुढे 'य' येऊन मग 'णिज्ज' प्रत्यय लागतो. उदा. गा-गाय-गायणिज्जफ