________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
२४५
द्वि. पु. तृ. पु.
एजा, एज्जासि, एजाहि एजा
एज्जाह एज्जा
टीप : १) कधी कधी सर्व पुरूषात व सर्व वचनात 'ए' हा एकच प्रत्यय अकारान्त धातूंना' लागतो.
२) कधी सर्व पुरूषात व सर्व वचनात ‘एज्जा' हा प्रत्यय लागतो. ३) कधी ‘एज्जासि' ऐवजी 'एजासि', एजाह' बद्दल ‘एजह' ३ आणि ‘एजा' चे स्थानी ‘एज' असे प्रत्यय लागलेले आढळतात. ४) कधी द्वि. पु. ए. व. त ‘एज्जसु' असा प्रत्यय लागलेला आढळतो.
आ) प्रत्ययापूवी होणारे फेरफार
१) अकारान्त धातूंचा अन्त्य 'अ' व प्रत्ययांतील आद्य 'ए' या दोहोंचा 'ए' होतो" उदा. पासेज्जा, पासेजाहि इ.
२) आकारन्त धातूंच्या पुढे प्रत्ययांतील आद्य 'ए' तसाच राहतो. उदा. गाएज्जा
३) एकारान्त व ओकारान्त धातूंच्या पुढे प्रत्ययांतील आद्य 'ए' चा लोप होतो. उदा. नेजा, होजा इ.
१ वैद्य, पृ. ५०, जैन पृ. २९ २ सुत्तागम खंड १, प्रस्ता, पृ. ४३ ३ पिशेल, पृ. ३२७ पहा ४ सुत्तागम खंड प्रस्ता. पृ. ४३
पिशेल, पृ. ३२७ पहा विध्यर्थांत द्वितीय वर्गीय धातूंची रूपे प्रथमवर्गीय अकारान्त वा तृतीय वर्गीय एकारान्त धातूप्रमाणे होत असल्याने ती येथे स्वतंत्रपणे दिलेली नाहीत. प्रत्ययांत 'जा' हे जोडाक्षर असल्याने मागील धातूच्या अन्त्य ए, ओ
बद्दल कधी इ, उ, लिहिले जातात. उदा. पासिज्जा, उदाहरिज्जा, हुज्ज ८ हेम ३. १५९ पहा.