________________
प्रकरण ७ : भाषाशास्त्रीय वर्णादेश
१२९
१) ञ्च = ण : पञ्चविंशति-पणवीस, पञ्चचत्वारिंशत्- पणयालीस, पञ्चत्रिंशत्
पणतीस २) ष्ट = ढ : वेष्टते = वेढेइ, वेष्ट = वेढ, श्लिष्टि = सेढि (चिकटणे), लोष्ट
= लोढ (ढेकुळ), अष्ट = अढ (आठ) ३) ष्ठ = ढ : कुष्ठ = कोढ (कोड) ११९ द्वित्वागम
मूळ संस्कृत शब्दात संयुक्तव्यंजन नसतानाही ते शब्द अर्धमागधीत आल्यावर मात्र कित्येकदा त्यांच्यात जोडाक्षर-एखाद्या व्यंजनाचे द्वित्व येते. यालाच द्वित्वागम म्हटले आहे.
___ मागील स्वर कोणताही असता हे द्वित्व झालेले आढळते. द्वित्वागम झाल्यावर मागील स्वर दीर्घ असल्यास तो ह्रस्व होतो. ह्रस्व असल्यास तो तसाच रहातो. (अ पुढे) : नख = नक्ख, परवश = परव्वस, अनुवश = अणुव्वस, बहुफल
= बहुप्फल, सचित्त = सच्चित्त, पुरुषकार = पुरिसक्कार, अदर्शन
__ = असण, कौतूहल = कोउहल्ल, अदीन = अद्दीण. (आ) पुढे) : खात = खत्त (खणलेले) ध्मात = धत्त (फुकलेले) कपाल =
कभल्ल, आलीन = अल्लिण (इ पुढे) : भक्तिभर = भत्तिब्भर, जित = जित्त, त्रिकाल = तिक्काल (ई पुढे) : तूष्णीक = तुण्हिक्क, क्रीडा = किड्डा, व्रीडा = विड्डा, नीड = नेड्ड. (उ पुढे) : उखा = उक्खा (पात्रविशेष), सुगति = सोग्गइ, साधुकार =
साहुक्कार. (ऊ पुढे) : दुकूल = दुगुल्ल, स्थूल = थुल्ल, भूयस् = भुज्जो, मण्डूक = मंडुक्क (ऋ पुढे) : ऋजु = उज्जु, व्याहृत = वाहित्त (बोललेले) (ए पुढे) : प्रेमन् = पेम्म, सेवा = सेव्वा, एक = एक्क, पेय = पेज, प्रेयस् _
= पेज्ज १ तैलादौ । हेम २.९८, सेवादौ वा। हेम. २.९९ २ बहुधा जोर देण्यास हे द्वित्व होत असावे. उदा. मराठीत : माझं मत्त (मत)
अडलय माझं खेट्टर (खेटर), नाकावर टिच्चून (टिचून)