________________
२१६
ग्राम पंचायत कार्यालय जामनेर, जि. जळगांव ग्राम पंचायत जामनेर, नि. जलगांव यांजकडून
__ श्री. पूज्य कन्हैयालालजी महाराज. यांचे सेवेशी. आपण सुचविल्याप्रमाणे आमचे जामनेर येथ.ल कांग नदीचे पात्रांत कोणत्याही प्रकारे मच्छीमारी व प्राणीमात्रची हत्या करूं नये, याबदल पंचायतीने दिलेल्या आश्वासना प्रमाणे पालन करण्याची जवाबदारी ता-१९-६-६४ रोजीचे समेत ठराब नं, ९ में एकमताने मंजूर केलेली आहे सदरचा ठराव आम्ही आपले चरणी सादर करीत आहोत ही विनंती
-: ठराव :-आपले जामनेर शहरचे वस्तीतून वाहत असलेले कांग नदीचे पात्रांत बोदवड सडके जवळील पुला पासून ते भूसावळ सडकेपर्यंतचे भागांत कोणीही इसमाने माच्छीमारी तसेंच कोणत्याहि प्रकारच्था जीव जीवाणूची हत्था करूं नये व नदी चे पात्रांतील पाणी घाण होईल असे कोणतेही कृत्य करूं नये केल्यास त्याचेवर कायदेशीर इलाज करण्यात यावा. दोन्ही हदीवर एकेक बोर्ड लावण्यांत यावा,
सूचकः- श्री बक गणपत महाजन अनुमोदक श्री नथू दगडू सुरळकर ठराव सवांनुमताने मंजूर
वरील प्रमाणे ठरावाद्वारे आमचे पंचायतीने गांवकण्यांचे वती ने पालन करण्याचे ठरविले आहे, तरी सदरचे ठरावाचा स्वीकार हावा ही विनंती कळावे,
आपला विश्वासू सरपंच ग्रामपंचायत, जामनेर,
श्री
११-११-६४ अमळनेर वरो म्युनिसिपालीटी अध्यक्ष, बरो म्युनिसिणली अमळनेर
श्री, रा रा, यांजकडून
पूज्यनीय कन्हैयालालजी महाराज
मुक्काम- अमलनेर
यांचे कडेस :अमळनेर बरो म्युनिसिपालीटी चे बॉम्बे म्युनिसिपल वरोज एक्ट १९२५ चे कलम ६१ (क्यू) खालील वायाज सरकार ठराव जनरल डिपार्टमेन्ट नं एसू ९१ (४३ ता, ४ जुहै १०३५ में मंजूर झाले आहेत, त्या वॉयलोज प्रमाणे अमळनेर येथील बोरी नदी चे पात्र मासे घरण्याचे बाबत मनाई करणारी नोटीस खालील प्रमाणे म्युनिसिपालटी कड्न काढणेत आली असून ती जाहीर करणेत आली आहे,
__ "अलमनेर म्युनिसिपल हदीत नोटीस' किल्ला रास्ता ते रेलवेपुलापर्यत् “या दरम्यान चे पात्रांत कोणीही मासे घरूं नये, या नोटीसचा भंग करणा-यावर कायदेशीर इलाज केला जाईल," कळावे.
अध्यक्ष, बरो म्युनिसिपालीटी अमळनेर दि, ११-११-१९६४ ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सोसाइटो हातेड खुर्द ता, चोपडे जि. जलगांव
__ता, २५-१२-१९६४ श्री कन्हैयालालजी महाराज यांचे सेवेसी:सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत हातेड व चेअरमेन विविध कार्यकारी सोसायटी हातेड खुर्द, ता, चोपडे, जि, जलगांव आजकडून:
आपल्या इच्छेप्रमाणे हातेड येथील ग्रामस्था तर्फे आमच्या गांवच्या पूर्व बाजूला जे नाला वाहतो त्या
Jain Education International
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org