________________
(३५) आहेत ती सर्व व्यर्थ ठरतील. यामुळे सर्वथा वस्तु नित्य किंवा अनित्य मानू नये. कथंचिन्नित्यानित्यात्मक वस्तु आहे असे मानावे. असे मानले असतां जीवाच्या बंधावस्था व मोक्षावस्थेचीही सिद्धि होते. व बंध व मोक्ष या दोन तत्वांची कारणे इत्यादिक पदार्थाचीही सिद्धि होते. यास्तव हे जिनेश, अशा युक्तियुक्त तत्वांचा उपदेशक आपणाशिवाय दुसरा कोण असूं शकेल!
विशेषार्थ:-जैनमतांमध्येच बन्धाचे व मोक्षाचे स्वरूप उत्तम रीतीने सांगितले आहे. येथे बन्धाचे स्वरूप विशेष रीतीने सांगितले असतां विषयान्तर होणार नाही असे वाटते. बन्ध खंणजे जीवाच्या प्रदेशामध्ये कर्माचें प्रदेश मिसळणे. ज्यावेळेस जीवाचा कमांशी संबंध होतो त्यावेळेस जीव व कर्म हे आपला स्वभाव सोडून तिसरी अवस्था धारण करतात. जसें हळद व चुना यांचे मिश्रण झाले झणजे त्याच्यामध्ये तांबडेपणा उत्पन्न होतो. हा तांबडेपणा केवळ चुना किंवा केवळ हळद यामध्ये आढळून येत नाही. परंतु या दोन पदार्थांचा एकजीव झाल्याने अशी अवस्था दिसून येते. तेव्हां या दोन पदार्थांनी जसा आ. पला स्वभाव सोडून दिला तद्वत् कर्माचा उदयकाल आला झणजे जीव चारित्र गुणापासून च्युत होतो व कर्मही आपल्या स्वभावापासून च्युत होते. व यामुळे त्या दोषापासून रागद्वेषात्मक तिसरी अवस्था होते. तेव्हां दोघेही आपआपले स्वभाव सोडतात. याचा अर्थ, जीव पुद्गल स्वरूपानें परिणत होतो व पुद्गल जीवस्वरूपाने परिणत होते असा, समजू नये. कारण ही दोन द्रव्ये सजातीय नाहीत तर विजातीय आहेत. जेथे सजातीयपणा असतो तेथें एक दुसऱ्याच्या स्वरूपानें परिणत होते. जसे पाणी वायुरूपानें परिणत होते. पाणी व वायू यांच्यामध्ये
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org