________________
( २७१) संस्कृत टीकाकाराचा शेवटचा प्रशस्तिसूचक श्लोक. यो नि:शेषीजनोक्तधर्मविषय:श्रीगौतमायैः कृतः। सूक्तार्थैरमलैः स्तवोयमसमः स्वल्पैः प्रसन्नै: पदैः ॥ तद्व्याख्यानमदो यथावगमत: किंचित्कृतं लेशतः । स्थेयाचंद्रदिवाकरावधि बुधप्रह्लादचेतस्यलम् ॥ १ ॥ ___ अर्थः-- थोड्या परंतु कोमल अशा शब्दांनी युक्त, निर्दोष व स्पष्ट अर्थास व्यक्त करणारी, जिनेश्वरप्रतिपादित धर्माचे पूर्ण वर्णन करणारी अशी स्तुति गौतमस्वामी व समंतभद्र आचार्य यांनी केली आहे. त्या स्तुतीचा आशय व्यक्त व्हावा ह्मणून यथाशक्ति माझ्या बुद्धीस अनुसरून मी ही टीका लिहिली आहे. ही विद्वान लोकांच्या आनंदी अंत:करणांत जोपर्यंत चंद्र व सूर्य आकाशांत राहतील तोपर्यंत राहो.
* *याप्रमाणे स्वयंभूस्तोत्र संपलें.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org