________________
(१.२३१)
साराचा उच्छेद-जाश केला; माया, मिथ्यात्व, निदान ही शल्ये ज्याने आपल्या आत्म्यापासून दूर केली; आणि जो गणधरादिकामध्ये श्रेष्ठ आहे, त्या श्री मल्लिजिनेश्वरास भी अनन्यभावाने शरण गेलो आहे.
तात्पर्य-तपश्चरण हे कमनिर्जरा व मोक्षाची प्राति करून देणारे आहे. ध्यान हा तपाचाच भेद आहे. एकत्वपितवीचार नांवाच्या ध्यानाने मल्लिजिनांना घातिकमांचा नाश केला. त्यामुळे त्यांना सर्व वस्तूंचे ज्ञान झाले. व्युपरत-क्रियानिवृत्ति नावाच्या ध्यानाने त्यांनी अधाति कमांचा नाश केला. त्यामुळे त्यांना मोक्षलक्ष्मीची प्राप्ति करून घेतां आली. त्यांनी काँचा नाश कसा केला व ज्ञान प्राप्ति त्यांना कशी झाली या शंकेचे उत्तर आचार्यांनी या श्लोकांत दिले आहे. असो. ..मोहरूपी मल्लाचा---पहिलवानाचा यांना पाडाव केला यामुळे यांचे मल्लि हैं नांव सार्थक आहे. जगामध्ये मोहमल्ल हा अद्वितीय पहिलबान त्याच्यावर विजय मिळविणे सामान्य माणसाला अगदी अशक्य आहे. त्याला जिंकण्याचे काम या जिनेश्वरांनी केलें यास्तव इंद्रादिकांनी या 'मल्लि' असें नांव
ठेविलें.
इति मल्लिनाथस्तुतिः । याप्रमाणे मल्लिनाथ जिनांचे स्तोत्र संपले.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org