________________
(७९)
,
हा साक्षात् फायदा झाला. व परम्परेनें त्यांच्या उपदेशानें पुण्याची प्राप्ति भव्यांना झाली. त्यायोगे ते स्वर्गादि ऐश्व - यस पात्र झाले ' पातितमारदर्पो ' हा शब्द या श्लोकांत ठेवला आहे. त्याचा अर्थही व्यक्त केला आहे. येथे विशेष सांगावयाचें तें हें कीं, महादेवानें कपाळावर असलेल्या आपल्या तिसऱ्या डोळ्याने मदनास भस्म केलें असें ह्मणतात. परंतु हें बिलकुल खोटें आहे. असें असतें तर तो श्री जिनेश्वरासारखा परम वीतरागी बनला असता. परंतु त्याच्या चरित्राचा आपण विचार केला तर तें अतिनिद्य आहे. असेच आपणास आढळून येईल. तो ऋषीपत्नीशी आसक्त झाला यामुळे त्याचें ऋषींनी लिंगच्छेदन केलें. त्याने पार्वतीला आपल्या अर्ध्या अंगामध्ये खिळून टाकिलें होतें. तेव्हां अशा या फक्कडापासून मदनाचा पराजय होणे, असंभवनीय आहे. यास्तव 'पातितमारदप' हे विशेषण श्री जिनेश्वरासच शोभते. व त्यानें पार्वतीबरोबर पुष्कळ विहार केला तो तिच्यांत अत्यंत विषयासक्त होऊन केला. व श्री जिनेश्वरांनी भूमण्डलावर लोककल्याणासाठी आकाश मार्गाने अधर विहार केला. यावरून दोघांच्या विहारामध्ये किती अंतर आहे हे दिसून येतें. यावरून अशा कुदेवाचें भजनीं लागून आपलें सम्यक्त्वरत्न गमाऊं नये हैं या श्लोकावरून व्यक्त होतें.
स्तोता आत्मन औद्धत्यं परिहरन्नाह ।
स्तुतिकार आपली उद्धतता सोडून नम्नता दाखवितात.
विषमज नाखण्डलः स्तोतुमलं तवर्षेः ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org