________________
प्रकाशकीय वक्तव्य
हा तत्त्वार्थसार नामक ग्रंथ आचार्य अमृतचंद्र यांनी रचला आहे. यामध्ये जीव-अजीव आदि सात तत्त्वाचे हेय उपादेय रूपाने विस्तारपूर्वक वर्णन केले आहे.
या ग्रंथाचे हिंदी भाषांतर स्व. पं. वंशीधरजी शास्त्री सोलापूर व पंडितप्रवर डॉ. पन्नालालजी साहित्याचार्य सागर यांनी केले आहे. त्याचा आधार घेऊन मराठी अनुवाद जैन संस्कृति संघाचे व्यवस्थापक पं. नरेंद्रकुमार भिसीकर शास्त्री यांनी सरल सोप्या मराठी भाषेत केला आहे. तो मराठी भाषा बोलणाऱ्या वाचकास लाभदायक होईल या भावनेने जीवराज जैन ग्रंथमाला संस्थेतर्फे आम्ही या ग्रंथाचे प्रकाशन करीत आहोत. या ग्रंथाचे मुद्रण कार्य खंड १ ला ( अधिकार १-२ ) व खंड ३ रा ( अधिकार ६-७-८ ) हे श्राविका मुद्रणालय मधून झाले आहे व खंड २ रा (अधिकार ३-४-५ ) प्रस्तावना व विषयानुक्रमणिकेचे मुद्रणकार्य मुद्रण सम्राट मुद्रणालयमधून झाले आहे.
याप्रमाणे ग्रंथाचे प्रकाशन कार्यात सहकार्य देणा-या वरील मुद्रणालयांचे व संपादकाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. याप्रमाणे हा ग्रंथ आम्ही अल्प मुदतीत प्रकाशित करून धर्मबांधव वाचकास सादर करीत आहोत.
आपला
मंत्री
रतनचंद सखाराम शहा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org