________________
तत्त्वार्थसार अधिकार ८ वा
जसे- हिवाळ्यात अग्नि स्पर्शनेन्द्रियाला सुख कारक वाटतो उन्हाळ्यात शीतवारा सुख कारक वाटतो. कोणी रोगादि दुःखाचा अभाव झला की मी सुखी आहे असे समजतो पापकर्माचा नाश होऊन पुण्यकर्माचा उदय असताना जे वैभव ऐश्वर्य धन संपत्ति प्राप्त होते त्याला सुख समजतात परंतु या सर्व सुखापेक्षा मोक्ष सुख हे जीवाचे स्वाभाविक सूख असल्यामुळे सर्वात श्रेष्ठ सुख आहे. या सुखाला संसारातील कोणत्याही सुखाची उपमा देता येत नाही.
मुक्त जीवाचे सुख सुषुप्त जीवाच्या सुखासारखे नाही
सुषुप्तावस्थया तुल्यां केचिदिच्छन्ति निर्वति । तद्यक्तं क्रियावत्त्वात् सुखातिशय तस्तथा ।। ५० ॥ श्रम क्लेशमद व्याधिमदनेभ्यश्च संभवात् ।
मोहोत्पतिविपाकाऊ दर्शनघ्नस्य कर्मणः ॥ ५१ ॥
अर्थ- कोणी मोक्ष सुखाला झोपलेल्या माणसाच्या सुखाप्रमाणे समजतात. परंतु ते समजणे योग्य नाही. सुषप्त अवस्थेत मनुष्य स्वस्थ झोपलेला असतो. काही क्रिया करीत नाही. पण मुक्त जीव हा जागृत असतो. त्याची ज्ञान-दर्शन क्रिया चालू असते. ऊर्ध्वगमन स्वभावामुळे एक समय ऊर्ध्वगति क्रिया देखील स्वाभाविक होते. सिद्धजीवाचे सुख अनुपम सातिशय सुख असते. सुषप्त अवस्थेत श्रमखद-मद-व्याधि-कामविकार आदि मोहनीय कर्माच्या उदयात व दर्शनावरण कर्माच्या उदयात संभवतात. पण मोक्षसुखामध्ये कोणतेही विकारभाव नसतात. आत्म्याचे स्वाभाविक सुख अनुभवतात.
मोक्षसुख अनुपम आहे लोके तत्सदृशो ह्यर्थः कृत्स्नेऽप्यन्यो न विद्यते । उपमीयेत तद् येन तस्मात् तान्निरूपम स्मृतं ।। ५२ ।। लिंगप्रसिद्धेः प्रामाण्यमनमानोपमानयोः । अलिंगचाप्रसिद्धं यत् तेनानुपमं स्मृतं ।। ५३ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org