________________
तत्वार्थसार
( उत्तरार्ध )
अध्याय ३ रा
( अजीवाधिकार )
मंगलाचरण
अनन्त केवल ज्योतिः प्रकाशित जगत्त्रयात् । प्रणिपत्य जिनान् सर्वानजीवः संप्रचक्ष्यते ॥ १ ॥
अर्थ - ज्यांच्या अनंत ज्ञान स्वरूप केवल ज्ञान ज्योतिमध्ये तीन्ही लोकातील सर्व चराचर पदार्थ स्वयं प्रकाशित होतात त्या सर्व सर्वज्ञ जिनेंद्र भगवंताना नमस्कार रूप इष्टदेव स्मरण रूप मंगल करून या अधिकारात अजीव पदार्थाचे वर्णन केले जाते.
अजीव द्रव्याचे ५ भेद
धर्माधर्मावथाकाशं तथा कालश्च पुग्दला : । अजीवाः खलु पंचैते निर्दिष्टाः सर्वदर्शिभिः ॥ २ ॥
अर्थ- सर्वदर्शी जिनेंद्र भगवंतानी अजीव द्रव्य पाच प्रकारचे सांगितले आहे. १ धर्म २ अधर्म ३ आकाश ४ काल ५ पुग्दल.
सहा द्रव्याचे निरूपण
एते धर्मादयः पंच जीवाश्च प्रोक्त लक्षणाः
षड् द्रव्याणि निगद्यन्ते द्रव्ययाथात्म्यवेदिभिः ॥ ३ ॥
अर्थ- द्रव्याचे जसे स्वरूप आहे तसे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या सर्वज्ञ देवानी वरील पांच अजीव द्रव्य व मागील दोन अध्यायात ज्यांचे वर्णन केले ते जीवद्रव्य याप्रमाणे द्रव्याचे सहाभेद सांगितले आहेत.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org