________________
५६
[ लाटचे मराठी
No.62
नक्कल
पान १
नंबर १२८
सीका
मसुदा
कर्ज रोखा शके १७१३ विरोधकृत नाम संवत्सरे माहे श्रावण शु॥१ प्रति पदा ते दिवशी खत लिखीतेधसको नाम राजश्री नीलो गोपाल यासी रिणको नाम नाहारसींग वीन जोरावरसींग राजे संस्थान वासदे तुम्हां पासून संस्थानचे बंदोबस्त करितां नजर वगैरे सरकारांत द्यावयाचा टराव जाहाला त्याचा हवाला तुम्ही घेतला वी॥
रुपये २१००० साल मजकूर सन इसने तीसेन.
१०००० भ।श्राखेर. १०००० आश्वीन आखेर. १००० भाद्रपद शु॥१
२१००० ७००० सन सलास तीसेन भाद्रपद अखेर. ७००० सन आर्वा तीसेन भाद्रपद अखेर. १०५० मनोती रुपये ३५००० दर सदे १॥ प्रमाणे आश्वीन शु॥ १ मीतीसे.
३६०५०
येकूण छत्तीस हजार पन्नास रुपये सरकारी पोते बाल तुम्हां पासून घेतले यासी व्याज दर माहा सदे रुपये १॥. दिडोत्रा प्रमाणे सदरहु मुदतीचे तारखे पासून पुढे वीनसुट देत जाऊं सदरहुची हुडणावल पडलेती देऊ यांसी ऐवज संस्थान मजकूरचे माहालचा ऐवज वसुलाचा येईल त्या पैकी संस्थानचे खर्चा पुरता ऐवज घेऊन बाकीचा पेवज तुहांस तुमचा ऐवज व्याज सुद्धा फीटे तो पर्यंत देत जाऊं संस्थान मजकुरी तुम्हां कडील कारकूनऐवजा करितां राहिल त्याचे ठरावाची यादी आलाहिदा करून दिल्ही आहे त्या प्रमाणे वर्तणूक करूं आणि त्याचे विद्यमाने जमाबंदीचा वगैरे ठराव करून ऐवज देत जाऊं त्यांत अंतर पडल्यास माहालचा बंदोबस्त तुम्ही करून देत जावा त्या बद्दल सीबंदी बगैरे खर्च वेच जो पडेल त्या सुद्धा ऐवज वसुल करून तुम्ही न्यावा नंतर माहालचा बंदोबस्त आम्ही करू यांत अंतर करणार नाहीं हे खत लिहून दिल्हे सही.
मोर्तब.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com