________________
प्रस्तावना.
मनुष्यप्राण्यांस. आरोग्यता, शक्ति. वः दीर्घायुपता वगर कसे प्राप्त होईल यासंबंधी तपास पाश्चिमात्यः देशांत एक सारखे चालू आहेत. व विद्वान डाक्तर लोकांनी यासंबंधी बराच शोध करून असे सिद्ध केले आहे की मनुष्यास जे. कांहीं रोग होतात तें दररोज खाण्यांत येणाऱ्या.मलिन व अमंगळ मांसासापासूनच होतात. तेव्हा अशा प्रकारचे अन्न लोकांनी खाऊ नये ह्मणून खटपट करण्याकरिता पाश्चिमात्य देशांत ( व्हेजिटेरिअन ) वनस्पतिआ. हाराचा फैलाव करण्यासाठी काही संस्था स्थापन झाल्या असून त्यांनी लाखो लोकांस मांसाहारापासूनः सोडविण्याची खटपट चालू ठेवली आहे. तसेच मुक्या जनावरावर होणा-या घातकी षणास: आळावालण्याकरतां: काही मंडळ्या स्थापन झाल्या असून थंचे चाललेले प्रयत्नः पाहून फारच आश्चर्य वाटते. जनावरांची जोपासना कशी करावी याचे सांगोपांग ज्ञान देण्याची व्यवस्था तिकडे करण्यांत आली आहे. व निरनिराळ्या प्रांतांत कुले, मांजर, बकरी, मेंढ, घोडा, गाय, बंगरे याची जोपासना कशी करितात यांसंबंधी मासिक पुस्तके काढून त्यांचा लोकांत प्रसार
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com