________________
wwwm. एक भाग्यवान् व्यापारी .......१९). शोधून, त्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न झाला; पण श्रीहरगोविंद दास आपल्या ज्ञानार्जनाच्या तळमळीपासून थोडेहि परावृत्त झाले नाहीत. जैनांचे प्रख्यात तीर्थ समेतशिखर, त्या पहाडावर जैन मंदिरांचे दर्शन घेऊन, श्रीहरगोविंददास काशीला गेले. त्या ठिकाणी एका जैन पाठशाळेचा बोर्ड पाहून तेथे त्यांनी प्रवेश मिळविला! त्या पाठशाळेंत श्रीहरगोविंददासनी प्रवेश करतांच, पाठशाळेच्या महंतानी, अचूकपणे, श्रीहरगोविंददासनां म्हटले, “या तुम्ही ?– हरगोविंद दास रामजी !!" __ काशीस ३ वर्षे राहून संस्कृत-व्याकरण, साहित्य-चंद्रिका, सहा हजार श्लोकांचे जैन व्याकरण, यांचा अभ्यास श्रीहरगोविंद दासनी त्या पाठशाळेत केला!
त्या अध्ययनानंतर श्रीहरगोविंद दास पुनः मुंबईस आले, आणि आई व वडील भावाच्या आग्रहाकरतां त्यांनी पुनः १५ रुपयांवर, मूळजी जेठा मार्केटांत, पूर्वीच्याच शेठकडे, कापड-दुकानी, नौकरी धरली!
परंतु, ती त्यांची सेवावृत्ति १ महिन्यापेक्षा अधिक काळ टिकली नाही. एकदा त्यांना असे वाटले की, आपण जोरदार व्यापार करून नशिब काढून लाखो रुपये मिळवावेत;
आणि केवळ त्यांच्या व्याजांत ग्रंथ मिळवून ज्ञानार्जन करावें. त्यासाठी आणि त्या कल्पनेने त्यांनी २५ हजार रुपये मिळवण्याकरतां उमराला गांवीं गूळ-तूप किराणा मालाचे दुकान टाकले. सुगंधी सामानहि त्या दुकानांत विकले जात असे. ते दुकान त्यांनी २ वर्षे चालविले; पण त्यांत फायदा होण्याऐवजी "व्यापाऱ्याला ठराविक देश अगर ठिकाण, असे कधीच
काही नसते!" Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
-
-
---