________________
www.unn. एक भाग्यवान् व्यापारी ......... 'ज्ञानदानाला' फार महत्व दिले आहे. ज्ञानप्राप्ति व ज्ञानदान यांची हरगोविंद दासनां एकसारखी तळमळ दिसून येते. ___ श्रीहरगोविंद दास प्रख्यात देशभक्त, प्रख्यात पुढारी, प्रख्यात पंडित प्रख्यात धनाढ्य, प्रख्यात सेनापती नसतील; पण श्रीहरगोविंद दास, आयुष्याची भूमिवर चाललेली लढाई यशस्वी रीतीने जिंकून दाखविणारे एक महान योध्दे आहेत, यांत थोडीहि शंका नाही. 'दीर्घायुष्य मिळवणे आणि चांगले जगणे' हे त्यांचे लहानपणापासूनचे ध्येय. "लोकमताने राहण्यापेक्षां निसर्गमतानें रहा;" हा त्यांचा संदेश. आयुष्य एक स्वप्न, छाया, पाण्यावरील एक बुडबुडा. किंवा एक प्रकारचा मोठा खेळ, असे जरी असले, तरी तो खेळ प्रत्येक व्यक्तिने यशस्वी केला पाहिजे,-पासापुरते तरी मार्क त्यांत मिळविले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह.
उगमस्थानी नदी अगदी लहान स्वरूपांत असते; व पुढे ती महा नदी होते, असा नियम दिसून येतो. तोच नियम श्रीहरगोविंद दासजींच्या आयुष्याला लागू आहे; परंतु तेवढ्या उपमेनें अगर तुलनेनें लेखकाचे समाधान होत नाही! श्रीहरगोविंद दासजींच्या पूर्वायुष्याला नदीची उपमा दिली आणि त्यांच्या आयुष्याची कल्पना केली, तर लेखकाला असें स्पष्टपणे म्हणता येईल, की, नदीने आपले लहान रूप टाकून देऊन, आपला विकास करून घेऊन, तीच नदी पुढे समुद्रासारखी विशाल झाली आहे!-तिला समुद्राचे स्वरूप आले आहे. कर्क-तत्व हे समुद्र-तत्व आहे. श्री हरगोविंद दासजींचा " खऱ्या राज्यकत्यांनी व्यापारी'च झाले पाहिजे. व्यापार माणि न्यापारी
यांचे संरक्षण-नियंत्रण म्हणजेच राज्य-संरक्षण." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com