________________
एक भाग्यवान् व्यापारी
अर्थात्
शाह हरगोविंददास रामजी
थोरा-मोठ्यांची चरित्रे, सर्वत्रच लिहिली जातात; चरित्रे
म्हणजे थोरामोठ्यांच्या वाटा ते ज्या ज्या रस्त्यांनी चालून गेले त्या त्या वाटांची-रस्त्यांची ती माहिती. प्रत्येकाचें आयुष्य म्हणजे एक मोठी शिडी आहे. थोर लोक त्या शिडीची प्रत्येक पायरी चढून वर कसे गेले, हे त्या त्या चरित्रांतून पहावयाचे असतें;-अनुभवावयाचे असते. चरित्र म्हणजे काय ! आणि आयुष्य म्हणजे तरी काय? तर, मनुष्य सर्व दिवसरात्र जो विचार करतो आणि वागतो, ते त्याचे विचार करणे आणि वागणे, त्या क्रियेला 'चरित्र' म्हणून नांव देता येईल. प्रत्येक मनुष्य, आपले आयुष्य घालवतो, म्हणजे एक प्रकारचा ती व्यक्ति प्रयोगच करीत असते. एकादा विणकर ज्याप्रमाणे सुताचा ताणा मागावर लावून विणावयास बसतो, तीच स्थिति प्रत्येकाची आहे. आयुष्य म्हणजे एक 'आल्बम'च म्हटले तरी चालेल. आयुष्याला 'डायरीचीहि' उपमा देतां येईल! आयुष्य हे कसे आहे ? तर एकाद्या भयंकर अद्भुत किल्ल्यासारखें अगर भुयारासारखे आहे. मनुष्य त्या किल्ल्याचा
" लढाईच्या वेळीच व्यापारीबांधव हे __ स्वदेशाचे शत्रु ठरतात!"
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com