________________
संपादकीय पुण्य प्राप्त करण्याचे अनेक मार्ग शास्त्रकारांनी आणि धर्मगुरुंनी दर्शविले आहेत. त्यातील एक आहे दान. दान म्हणजे दुसऱ्याला आपले काहीतरी देऊन त्याला सुख देणे.
दान देण्याची प्रथा मनुष्याच्या जीवनात लहानपणापासूनच अंगिकारण्यात आली आहे. लहान मुल असेल, त्याला सुद्धा देवळात घेऊन जातात तेव्हा बाहेर गरीब लोकांना त्याच्या हातून पैसे देतात, खाऊ घालतात, देऊळातील दानपेटीत त्याला पैसे टाकायला सांगतात. अशा प्रकारे लहानपणापासूनच दान देण्याचे संस्कार मिळत राहतात.
दान देताना आतील अजागृति असेल तर दान देऊनही कशा प्रकारे खोट खाल्ली जाते त्याचे सूक्ष्म निरुपण परम पूज्य दादाश्रींनी केले आहे. दान देताना कोणती जागृति ठेवावी? सर्वात उच्च प्रकारचे दान कोणते? दान कोणकोणत्या प्रकारे होऊ शकते? दानाचे प्रकार कोणकोणते ? त्यामागील भावना कशी असावी? दान कोणाला द्यावे? वगैरे, वगैरे. दान संबंधी असलेल्या अनेक गोष्टी, ज्या दादाश्रींच्या ज्ञानवाणी द्वारे निघालेल्या आहेत. ते प्रस्तुत पुस्कात संकलित करुन प्रकाशित करण्यात आले आहे. जे सुज्ञ वाचकास दान देण्यासाठी उत्तम मार्गदर्शिका म्हणून उपयोगात येईल.
- डो. नीरूबहन अमीन