________________
दान
तर पुढच्या जन्माचे हित होईल, नाहीतर सर्व झोपेत जाईल. हे जे दान दिले ते सगळे झोपेत गेले. जागृत अवस्थेत चार आणे जरी गेले तरी फार झाले. दान दिले व आतून इथल्या कीर्तीची इच्छा असेल, तर सगळे झोपेत गेले समजावे. पुढच्या जन्माच्या हितासाठी जे दान इथे दिले जाते तो जागृत म्हटला जातो. हिताहीतचे भान म्हणजे स्वतःचे हित कशात आहे व स्वत:चे अहित कशात आहे त्याप्रमाणे जागृती असणे ते! पुढच्या जन्माचा काही ठिकाणा नसेल आणि इथे दान देत असेल त्याला जागृत कसे म्हणावे?
असे अंतराय पडतात हा भाऊ कोणाला दान देत असेल, तेथे कोणी बुद्धीवान म्हणेल की, अरे, याला का देताय? तेव्हा तो भाऊ म्हणेल, 'आता देऊ द्या ना, गरीब आहे.' असे म्हणून दान देतो आणि तो गरीब घेतो. पण तो बुद्धिवान जो बोलला त्यामुळे त्याने अंतराय टाकला. म्हणून मग त्याला त्याच्या दुःखातही कोणी दाता भेटणार नाही. जिथे स्वतः अंतराय टाकतो, त्याच जागेवर तो अंतराय काम करतो.
प्रश्नकर्ता : वाणीने अंतराय टाकले नसेल, पण मनाने अंतराय टाकले असतील तर?
दादाश्री : मनाने टाकलेल्या अंतरायाचा जास्त परिणाम होतो. ते तर दुसऱ्या जन्मात परिणाम करतात. आणि हे वाणीने बोललेल्याचा परिणाम या जन्मात होतो. वाणी निघाली की नगदी झाले, कॅश झाले. म्हणून मग फळ सुद्धा नगद येते आणि मनाने जे चित्रण केले ते तर पुढच्या जन्मी रुपक होऊन येणारच.
आणि असे दूर होतात अंतराय प्रश्नकर्ता : अर्थात् अशी जागृती ठेवावी की थोडासा पण उलटसुलट विचार करु नये.