________________
दान
(श्रीमंत) अभयदान करत असत, परंतु आता त्यांच्याकडून हे होत नाही, ते कच्चे आहेत. लक्ष्मीच कमवून आणली ना, आणि ते सुद्धा लोकांना घाबरवून, घाबरवून.
प्रश्नकर्ता : भयदान केले आहे ?
दादाश्री : नाही, असे म्हणू नये. असे करुनही ज्ञानदानात तर खर्च करतात ना? तेथे वाटेल तसे करुन आलेत, पण येथे ज्ञानदानात खर्च करतात ते उत्तम आहे, असे भगवंतानी म्हटले आहे.
ज्ञानीच देतात 'हे' दान म्हणून श्रेष्ठ दान अभयदान, दुसऱ्या क्रमांकावर ज्ञानदान. अभयदानाची प्रशंसा भगवंतांनीही केली आहे. पहिले, कोणीही तुमच्यामुळे भयभीत होऊ नये, असे अभयदान द्यावे. दुसरे ज्ञानदान, तिसरे औषधदान, आणि चौथे आहारदान.
ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठ अभयदान! परंतु लोक अभयदान देऊ शकत नाही ना! ज्ञानी एकटेच अभयदान देतात. ज्ञानी आणि ज्ञानीचा परिवार असतो, ते अभयदान देतात. ज्ञानीचे फोलोअर्स (अनुयायी) असतात ते अभयदान देतात. कोणालाही भय वाटू नये असे राहतात. समोरचा भयरहित राहू शकेल असे वागतात. कुत्राही घाबरणार नाही असे त्यांचे वर्तन असते. कारण कोणालाही दुःख दिले ते दुःख स्वत:च्या आत पहोचते. समोरच्याला दुःख दिले तर आपल्या आत ते पोहोचते. म्हणून आपल्यापासून कोणत्याही जीवाला किंचितमात्र भय वाटू नये असे वागावे.
'लक्ष्मी' तीन्हीमध्ये येते प्रश्नकर्ता : मग काय लक्ष्मीदानाचे स्थानच नाही?
दादाश्री : लक्ष्मीदान, हे ज्ञानदानात आले. आता तुम्ही पुस्तके छापून घेतलीत ना, तर लक्ष्मी त्यात आलीच, ते ज्ञानदान.