________________
10
दान
(मोफत) द्यावी. मग त्याने ते औषध घेतले तर तो बिचारा चार-सहा वर्ष जगेल. अन्नदानाच्या तुलनेने औषधदानाने अधिक फायदा आहे, समजले का तुम्हाला? कशात फायदा अधिक ? अन्नदान चांगले की औषधदान ?
प्रश्नकर्ता : औषधदान.
दादाश्री : औषधदानाला अन्नदानापेक्षा अधिक मूल्यवान मानले आहे कारण तो दोन महिने पण जिवंत ठेवतो. मनुष्याला थोडे जास्त काळ जिवंत ठेवतो. वेदनेतून थोडी फार मुक्ती करवितो.
बाकी अन्नदान आणि औषधदान तर आपल्याकडे बायका, मुले सर्व सहज करत असतात. ते काही फार मूल्यवान दान नाही. पण तरी केले पाहिजे. जर असा कोणी आम्हाला भेटला, आमच्याकडे कोणी असा दुःखी मनुष्य आला, तर आपल्याकडे जे काही तयार असेल ते लगेच त्याला देऊन टाकावे.
उच्च ज्ञानदान
मग त्याच्या पुढे ज्ञानदान म्हटले आहे. ज्ञानदानात पुस्तके छापावी, लोकांना समजावून खऱ्या मार्गावर आणावे, आणि लोकांचे कल्याण व्हावे अशी पुस्तके छापून घ्यावी इत्यादी, हे झाले ज्ञानदान. ज्ञानदान दिले तर चांगल्या गतीत, उच्च गतीत जातो किंवा मग मोक्षालाही जातो.
म्हणून मुख्य वस्तू ज्ञानदान असे भगवंतांनी म्हटले आहे. आणि जिथे पैशांची गरज नाही तेथे अभयदानाची गोष्ट सांगितली आहे. जेथे पैशांची देवाण - घेवण आहे तेथे हे ज्ञानदान म्हटले आहे. आणि साधारण परिस्थिती, नरम परिस्थितीच्या लोकांना औषधदान व आहारदान द्यायला सांगितले आहे.
प्रश्नकर्ता : पण पैसे उरले असतील, तर त्याचे दान तर करावे
ना ?