________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय बारावा.
ALTICAL भिक्षावृत्ति.
पान ६६७.
मध्याह्नसमये योगे कृत्वा सामयिकं मुदा ॥ पूर्वस्यां तु जिनं नत्वा ह्याहारार्थं व्रजेच्छनैः ॥ ६९ ॥ पिच्छं कमण्डलुं वामहस्ते स्कन्धे तु दक्षिणम् ॥ हस्तं निधाय सन्दृष्टया स व्रजेच्छ्रावकालयम् ॥ ७० ॥ गत्वा गृहाङ्गणे तस्य तिष्ठेच्च मुनिरुत्तमः ॥ नमस्कारपदान्पंच नववारं जपेच्छुचिः ॥ ७१ ॥
अर्थ - मध्यान्हाचा समय प्राप्त झाला असतां संतोषानें सामायिक करून, पूर्व दिशेकडे श्रीजिनाला नमस्कार करून यतीनें आहाराकरितां हळू हळू निघावें. त्यानें पिंछि आणि कमंडलु डाव्या हातांत घेऊन उजवा हात खांद्यावर ठेवावा आणि रस्त्यानें नीट पाहात श्रावकाच्या घरीं जावें. तेथें अंगणांत उभा राहून पंचनमस्कारपदांचा नऊ वेळ जप करावा. ह्मणजे नऊ वेळा जप होईपर्यंत उभे रहावें.
भिक्षादानविधि.
तं दृष्ट्वा शीघ्रतो भक्त्या प्रतिगृह्णाति भाक्तिकः ॥ प्रासुकेन जलेनाङ्क्षी प्रक्षाल्य परिपूजयेत् ॥ ७२ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only