________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ALO
सौमसेनकृत वाणकाचार, अध्याय अकरावा. पान ६१४. शान्त्याद्याशीभरवं तु क्षिपेत्तन्मृधिन चाथवा ॥ १२३ ।। मूनि तण्डुलनिक्षेपः स्याद्रत्नत्रयमन्त्रतः॥
कन्याऽप्येवं द्विरुन्मृज्य मूनि क्षेपान्तमाचरेत् ॥ १२४ ॥ अर्थ- प्रथम वराने आपल्या दोनी हातांस तूप व दूध लावून ते हात दोन वेळा वधूच्या ओंजळीस पुसावत.. नंतर त्या ओंजळीत स्वच्छ पांढऱ्या अक्षता घालाव्यात. नंतर वधूच्या पित्याने वराच्या ओंजळीस तूप, दध लावून त्यांत दोन वेळां अक्षता घालाव्यात. ह्याममाणे झाल्यावर शांतिमत्राने किंवा आशीर्वादमंत्राने वराने वधूच्या मस्तकावर आपल्या ओंजळींतील अक्षता टाकाव्यात. नंतर वधूने आपल्या ओंजळीतील अक्षता वराच्या मस्तकावर टाकाव्यात. ह्याप्रमाणे तीन वेळ वराने केल्यावर वधूनें प्रथम वराच्या ओंजळीस दूध तूप लावून त्यांत अक्षता घालाव्यात. नंतर वधूच्या पित्याने वधूच्या ओंजळीस, दुध तूप लावून त्यांत अक्षता घालाव्यात. मग वधूने शांतिमंत्राने किंवा आशीर्वादमंत्राने प्रथम वराच्या मस्तकावर अक्षता टाकाव्यात. नंतर वराने वधूच्या मस्तकावर अक्षता टाकाव्यात. ह्याप्रमाणे तीन वेळ करावें. ह्या क्रियेत शांतिमंत्र किंवा आशीर्वादमंत्र ह्यांची योजना करणेस वर सांगितलेच आहे; तसे करावें., किंवा रत्नत्रयमंत्रांची योजना करावी. ते मंत्र वर दिलेलेच आहेत. हा वर्धापनविधि सांगितला. arooreerecretweeeeeeeeewaneaawaareeeeeeeeeeeeaase
For Private And Personal Use Only