________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६१०. greementeeneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeedes
कन्यावरण व कन्यादानविधि, एतद्गोत्रे प्रजातस्यैवैतन्नाम्नः प्रपौत्रकः ॥ अस्य पौत्रोऽस्य पुत्रश्चाप्यतदाख्योऽहमित्यथ ॥१६॥ एतद्गोत्रे प्रजातस्यैवैतन्नाम्नः प्रपौत्रिकाम् ॥ पौत्रीमस्यास्य पुत्रीमप्येतदाख्यामिमां वृणे ॥११७॥ इति ब्रूयाच्चतुर्थी च प्रपौत्रादिपदे स्वके॥ प्रयोज्य प्रदेत्कन्यां वरणे समये वरः ॥११८ ॥ स्वपक्षं पूर्वमुक्त्वैवमपरं च वदन्वदेत् ।। त्वं वृणीष्वेति वा तुभ्यं प्रयच्छामीति मातुलम् ॥ ११९ ॥ दक्षिणं पाणिमेतस्याः ससुवर्णाक्षतोदकम् ।। पित्रा समन्त्रक दत्तं गृह्णीयात्स प्रयत्नतः ॥ १२० ॥ धर्मेण
पालयेत्यादि कन्यापितरि वक्तरि॥ धर्मेणार्थेन कामेन पालयामीत्यसौ वदेत् १२१ __ अर्थ- आतां कन्यावरणाचा व कन्यादानाचा विधि सांगतात. कन्यावरणाच्या वेळी वराने प्रथम" अमक्या गोत्रांत उत्पन्न झालेल्या अमक्याचा पणतु, आमक्याचा नातु अमक्याचा पुत्र, अमुक नांवाचा मी; अमक्या गोत्रांत उत्पन्न झालेल्या अमक्याची पणती, आमक्याची नात, अमक्याची कन्या, अशा अमुक नांवाच्या ह्या कन्येस वरतों-असें ह्मणावे. मग वधूच्या पित्यानें “ त्वं वृणीय" ह्मणजे तूं वर, किंवा 2"तुभ्यं प्रयच्छामि झणजे तुला देतों" असें ह्मणावें. नंतर वरपक्षाकडील मातुल वगैरे मंडळींनी-अमक्या गोत्रांत उत्पन्न झालेल्या अमुक पुरुषाचा पणतु, आमक्याचा नातु, अमक्याचा पुत्र, अमुक नांवाचा हार
For Private And Personal Use Only