________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५९५.
NNNNNNNNN~~r
अलंकृत्य सुतादानं दैवो धर्मः प्रचक्ष्यते ॥ ७२ ॥
अर्थ - मोठ्या यज्ञांत यथाविधि जिनपूजा करणान्याला अलंकार घालून कन्यादान करणें ह्याला दैवविवाह ह्मणतात.
आर्षविवाह
एकं वस्त्रयुगं द्वे वा वरादादाय धर्मतः ॥
कन्याप्रदानं विधिवदार्षो धर्मः स उच्यते ॥ ७३ ॥
अर्थ - - वरापासून एक किंवा दोन वस्त्रयुग्में ( धोतरजाडे ) घेऊन त्याला धर्माप्रमाणें यथाविधि कन्यादान करणे ह्याला आर्षविवाह ह्मणतात.
प्राजापत्यविवाह.
सहोभौ चारतां धर्ममिति तं चानुभाष्य तु ॥
कन्याप्रदानमभ्यर्च्य प्रजापत्यो विधिः स्मृतः ॥ ७४ ॥
अर्थ- 'तुझीं दोघे एकमेकाबरोबर धर्माचरण करा!' असे वराला सांगून त्याची पूजा करून जें कन्यादान केलें जातें, त्याला प्राजापत्यविवाह ह्मणतात.
आसुर विवाह.
For Private And Personal Use Only