________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
AURAVANGUAVAN
सोमसेनकृत तैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान १२. preeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeMeet
गर्वोन्मुक्तो यमाख्यो भवभयचकितो लौकिकाचारयुक्तः॥२०॥ अर्थ-- लोकांना शास्त्राचा उपदेश करणारा जो मनुष्य त्याला वक्ता असें ह्मणतात. तो सर्वशाखें । जाणणारा, बुद्धिमान् व मोक्षसुखाची इच्छा करणारा असा असून, चांगली तत्त्वे लोकांना स्पष्टपणे सम-8 जाऊन देणारा, निर्लोभ, स्पष्ट बोलणारा, सर्व लोकांच्या कल्याणाची काळजी बाळगणारा, असा असावा. त्याला क्रोध असू नये, व गर्व असूं नये. तो स्वतः संयमी असावा. त्याला संसाराची भीती वाटत असावी, आणि तो लोकांत चाललेल्या सदाचारांचें स्वतः आचरण करणारा, असा असावा.
ग्रंथाचे लक्षण. यस्मिन् ग्रन्धे पदार्था नव दशविधको धर्म एकोऽप्यनेको ।
जीवाजीवादितत्त्वानि सुशुभविनयो दर्शनज्ञानचर्याः॥ ध्यानं वैराग्यवृद्धिः सुजिनपतिकथा चक्रिनारायणी वा।
सोऽयं ग्रन्थस्ततोऽन्या जनमुखजानता वैकथाऽहो भवेत्सा ॥२१॥ 5 अर्थ-नऊ पदार्थ, दहा प्रकारचा धर्म, जीवाजीवादितत्त्वे, विनय, दर्शन, ज्ञान, चारित्र, ध्यान, वैराग्य, जिनपति चक्री व नारायण ह्यांची कथा, इतक्या गोष्टी ज्यांत सांगितल्या असतील तोच ग्रंथ होय. ह्या गोष्टी ज्यांत सांगितल्या नाहीत ते ग्रंथ नसून, त्या सामान्य लोकांनी सांगिलेल्या विकथा आहेत असे समजावें.
Manakaceereexeeeeeeeee
For Private And Personal Use Only