________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा.
पान ४५०.
Denn
पञ्च दिनानि चेटीनां सूतकं परिकीर्तितम् ॥ स्वामिगृहे प्रसूताचेद्धोटकीनां तथैव च ॥ १०७ ॥ उष्ट्री गौर्महिषी छागी प्रसृता चेद्गृहे यदा ॥
दिनमेकं परित्याज्यं बहिश्चेन्न हि दोषभाक् ।। १०८ ।।
अर्थ एखादी दासी आपल्या मालकाच्या घरांत प्रसूत झाली असतां तें घर पांच दिवस अशुद्ध समजावें. त्याप्रमाणें बोडी पोसवली असतां समजावें. उंटीण, गाय, मैस आणि शेळी ह्रीं जनावरें घरांत व्यालीं असतां तें घर एक दिवस अशुध्द समजावें. आणि बाहेर व्यालीं असतां अशुद्ध समजण्याचें कारण नाहीं.
भांड्यांची शुद्धि. भाजनानि मृदां यानि पुराणानि तु सन्त्यजेत् ॥ धातुभाण्डानि वस्त्राणि क्षालनाच्छुचितां नयेत् ॥ १०९ ॥ दद्यात्तु प्रथमे दानं षष्ठे वा पञ्चमेऽपि वा ॥ दशमे देवपूजा स्यादन्नदानं तथा बलिः ॥। ११० ।।
जातकर्म.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only