________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४४१. wweeeeeeeeeeeeeeeeeeeveerence
अथवा शमीची समिधा अगर तीन ठिकाणी पांढरे असलेले शाळिंद्राचे पंख घेऊन त्याने सीमंत काढावा.! १ सीमंत काढतांना ज्याने सीमंत काढावयाचा असेल त्याच्या अग्राला तेलांत खललेला सिंदूर लावावा.
आणि मग तसल्या काडीने सीमंत काढावा. मग गर्भिणीच्या पतीने तिच्या मस्तकावर आणि १ उदरावर उंबराच्या सालीचे चूर्ण टाकावें. आचार्याने उंबरांच्या फलांची केलेली माला तिच्या गळ्यांत घालावी. नंतर राहिलेला बाकीचा पूजा वगैरे विधि पूर्वीप्रमाणे करावा.
अथ मन्त्रः ॥ पुण्याहवाचनैराचार्यो गर्भिणी सिञ्चयेत् ॥ ॐ हीं श्रीं क्लीं क्रौं अ सि आ उ सा उदुम्बरकृतचूर्ण समस्ते जठरे चेयं इवी क्ष्वीं स्वाहा । अनेनोदरं वा मस्तकं वा उदुम्बरचूर्णेन सेचयेत् ॥
ॐ नमोऽहते भगवते उदुम्बरफलाभरणेन बहुपुत्रा भवितुमर्हा स्वाहा ।। _ अनेनोदुम्बरफलमालां कण्ठे क्षिपेत पुरुषः॥ इति सीमन्तविधिः॥ __ अर्थ- पुण्याहवाचन मंत्रांनी आचार्याने गर्भिणीच्या मस्तकावर कुंभजलाने सेचन करावें. नंतर, 'ॐ हीं श्रीं' इत्यादि मंत्रानें गर्भिणीच्या पतीने तिच्या मस्तकावर किंवा उदरावर उंबराच्या सालीचें चूर्ण सिंपडावें. मग 'ॐ नमो' इत्यादि मंत्राने आचार्याने तिच्या गळ्यांत उंबरांच्या फलांची माला घालावी. हा सीमंतविधि सांगितला. aaaranewwwweeeeeeeeeeerwecaneww.wecancease
AVACAN
Meeeeewa
For Private And Personal Use Only