________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा.
~~N~~ren
जिनेंद्राच्या उजव्या बाजूस दर्भासनावर बसावें.
पान १६१.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
वनिताहस्ततो वाऽन्यशिष्यहस्तान्तथाऽपि च ॥ गृहीत्वा त्वर्त्तनाद्रव्यं पूजयेज्जिननायकम् ॥ ४८ ॥
अर्थ— नंतर स्वस्त्रीकडून किंवा शिष्याकडून अथवा दुसऱ्या कोणाकडून आणविलेलें पूजाद्रव्य ( पूजेचे पदार्थ ) घेऊन, त्या ठिकाणीं पुढीलप्रमाणे श्रीजिनेंद्राची पूजा करावी.
पञ्चवर्णैर्महाचूर्णै रङ्गवल्लीं समालिखेत् ॥ कदलीसल्लकीस्तम्भैरिक्षुदण्डैः सतोरणैः ॥ ४९ ॥ घण्टाचमरसम्भूषैर्भूषयेजिनवेदिकाम् || पूर्णकुम्भाचैनाद्रव्यदर्भाश्च वामभागतः ॥ ५० ॥ गन्धकुट्यां जिनेन्द्रस्यं प्रतिमां च निवेशयेत् ॥ सिद्धचक्रस्य यन्त्रं च पूजयेद्गुरुपादुकाम् ॥ ५१ ॥ सहस्रनाम देवस्य पठेत्तावद्विधानतः ॥ सकलीकरणं कृत्वा शोधयेन्निजदेहकम् ॥ ५२ ॥ गन्धपुष्पाक्षतेस्तोयैः पूजाद्रव्याणि शोधयेत् ॥ पूजोपकरणस्तोमं शोधच्छुचिभिर्जलैः ॥ ५३ ॥
अर्थ — पांच रंगांच्या निरनिराळ्या चूर्णानें रंगवल्ली काढावी. केळी किंवा सळई ह्यांचे खांब, उंस, तोरण, घांट, चवऱ्या आणि अनेक प्रकारचीं भूषणें ह्यांच्या योगानें ती वेदिका (कट्टा ) सुशोभित करावी.
For Private And Personal Use Only