________________
प्रसंग पाचवा : ५९ अहो त्या नगरीचा राजा । वैजयंत नामे असे वोजा । निजात्मजवत् पालिति प्रजा । धर्मकाजा सावध असे ॥१०॥ भव्यश्री नामे करोनि । असे तयाचि भामिनि । स्वरूपे जैसि पद्मिनि । स्वामिचरनि लीन असे ॥११॥ स्वकिय भर्ताराचे संग । भोगिति नित्य नवनवे भोग । जिनमार्गि असे अनुराग' । जागेजाग पुण्याचा ॥१२॥ कवने येकिय दिवसि । मंचकि पहुडलि होति निसि । पश्चिमरयनि निजमानसि । तदा सुस्वप्नासि पाहिले ॥१३॥ मग सर्वार्थसिद्धिपासुनि । अहंमिंद्र देव चवोनि । भव्यश्रीचे गर्भाधानि । निजात्मा लागुनि ठेविले ॥१४॥ मग दिवस दिवसाप्रति । पिडारहित गर्भ वाढति । तव तव मातृपिताचित्ति । हरुष वाढति उत्कृष्ट ॥१५॥ तदाष्टमास झाल्यावरि' । दोहद उद्भविले अंतरी । तेन्हे कृश दिसे शरीरि । ऐसी नारी नृपे पाहिली ॥१६॥ तदा भूपति वदे हे प्रिये । त्वदंगे व्यथा उद्भवलि काय । ते त्वा मज शीघ्र वदावे । संकोच काय असे धरिला ॥१७॥ जे इच्छा तवांतरि असे । ते ते पूर्विन भर्वसे। मद्गृहि काहि न्यून नसे । दुर्लभ नसे स्वर्गवस्तु ॥१८॥ मग ते वदे स्वामीप्रति । जिनधर्म वसे मम चित्ति । तीर्थयात्रा करावि निगुति । मम चित्ति हेचि वसे ॥१९॥ ऐसे वाक्य आईकोनि । जे जे होते स्त्रियेचे मनि । न्हवन पूजा आद्य करुनि । सर्व शुभ मनि पूर्विलि ॥२०॥
१. प्रीति २. दोहले
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org