________________
७४६ : आराधना-कथाकोष
ऐकोनी वाद्याचा गजर । दर्शनी पाहू महावीर । कमळपुष्प धरी मुखाग्र । पूजाया देवेंद्र चालला ॥५५॥ मार्गी जाता रायाचा हस्ती । पाय पडला तया वर्ती । वर्द्धमान पूजावे चित्ती । अंती मती मृत्यु जाहला ॥५६ ।। भावपूजा अंत:करण । भाव जडला महत् पुण्य । स्वधर्मस्वर्गी देव होऊन । महद्धिक नाम मुख्येंद्र ॥५७॥ पहा हो बेंडकुळा इंद्र । त्रिजगी पुष्पपूजा थोर । पूजा त्रिशुद्ध भावसूत । जीव पवित्र का न होय ॥ ५८ ॥ तेव्हा अंतर्मुहूर्त | षोडष वर्षे नवयौवन । दिव्यस्वरूप ते लावण्य । पूर्वपुण्येन त्या विभूती ।। ५९ ।। नाना नवरत्नाचे हार । दिव्यवस्त्रादि अलंकार । सुगंध सुमनाचे हार | इंद्रायनी कर घालिती ॥ ६० ॥ जानोनिया अवधिज्ञानी । पूर्वभवांतराची कानि । पूजावया समोशरणी । बैसोनी विमानी ऐश्वर्यं ॥ ६१ ॥ सिरि मुकुट रत्नजडित । भेकचिन्ह माथा शोभत । सहस्रदळ पुष्पाचित । हर्षचित्त षट्पद जैसे ॥६२॥ पूजा श्री जिनराजचरणी । सर्वसुखात ते दायिनी । श्रेणिक पाहोनिया नैनी । गौतम मुनीसी पुसतु ||६३|| स्वामि याचे मुकुट सीरि । बेंडकचिन्ह कैशापरी । याचे कारण सांगावे वैखरी । संशयांतरी तमहेळी ||६४|| ते ऐकोन गौतम मुनी । भव नृत्य त्या तुर्यज्ञानी । सांगे मधुरगिरा वानी । सर्व करणी मिथ्यातिची ॥ ६५ ॥ भव्य जीव सर्व ऐकती । बारा सभा चेलना सती । पूजाफळ जे नर करिती । सुख भोगिती स्वर्गमोक्ष ||६६ ||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org