________________
७४४ : आराधना कथाकोषं
मिथ्यामती तो सदा प्राणी विहिर करितो अंगणी । आयुपुरा त्या आर्त्तध्यानी । पसुयोनि बेडुककुळा तो ॥३१॥ नरा मृत्यु पापयोगेन । जळचर जाला आर्त्तध्यान | तस्मात् पापात न करण । भव्यजन सम्यक्त्वी प्राणी ||३२| तत् भवदत्ताख्या स्त्रियसी । अष्टान्हिक व्रत तियसी । स्वहस्ते जळ आणायासी । मंडूक तयसी पाहिले ||३३|| त्यासी जाल जातिस्मरण । तदांगे चढता दे लोटून | पुनः ये तो पूर्वप्रीतीन । दे लोटून कंटाळुनिया ||३४|| तोचि पाहोनिया दर्दुर । आनिक असती जळचर । हृदयी करीते विचार । पुसावे बर गुरूराया ॥ ३५ ॥ तेव्हा ते गेली चैत्याल्यासी । पुसे श्री सुव्रत मुनीसी । अवधिज्ञाने सांगे तिसी । नागदत्तासी रौद्रध्यान ||३६|| पापे जाला जळी मंडूक । तुज पाहोनी ममता सुख । अंतरी करी सदुक्ख । जालो विन्मुख देवगुरूसी ॥३७ || ऐकोनी स्वामिसी नमन । गृहासी गेली आनंदान । भेक आनिला हिरीतून | ठेविला नेऊन हौदात ||३८|| तत् समयी विपुलाचळी | श्री वर्धमान महाबळी | षड्ऋतु पुष्पफळावळी । पाहे वनमाळी आश्चर्य ||३९|| पुष्पफळात घेवोनिया । श्रेणिकासमीप जावोनिया । नमस्कारोनी सांगे राया । ठेवोनीयाते पुष्पफळ ||४०|| ईंद्र नागेंद्र चंद्र सूर्य । पूजा करिती पदद्वय । श्री वर्द्धमान देवराय । समुदाय समोशरणी ॥४१॥ श्रेणिकरायान ऐकोनिया । सभेसहित उठोनिया । परोक्षवंदना करोनिया । वनमाळिया वस्त्रार्पण ||४२||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org