________________
प्रसंग एक्कावन्नावा : ७३३ पूजा अभिषेक नित्यशः । सुपात्रदान चतुविधिशः। जन्मभूमी पुण्याची आशा । स्वस्थचित्ताशा तृप्त जाली ।।२१२।। मग विचार करोनी मनात । परिवार आनी समस्त । अठरा सहस्र स्त्रियाते । तेरपुरात वस्ती जाली ।।२१३।। पूर्वी वर्धमान देवानी । समवशरणी बैसोनी । शतेंद्र बारसभा ज्ञानी । पंचमीचे दिनी माहोसुध ।।२१४।। जैनकाशी पुण्यक्षेत्र । भव्य प्राणी येताती याचे । अभव्यासी न घडे मात्र । संसारसूत्र गुंगुंगती ।।२१५।। करकंडु राजा सज्ञान । सर्वसुखी पूर्वपुण्येन । संपत्ति संतती सद्गुण । स्वरूप गुण शीलवंत ।।२१६।। काही एक दिवस तेथ । क्रमिता हृदयी चिंतितार्थ । भिल्लाची सूचना वचनार्थ । धारासीव पंथे चालावे ।।२१७॥ पावले चारू पर्वतासी । सहस्रखांब चैत्याल्यासी । उतरले परिवारेसी । परोक्ष वंदनेसी साष्टांग ।।२१८॥ शुचीभूत ते होवोनिया । न्हवन पूजा करोनिया । गंधोदक घेवोनी तया । मोक्षा जावया मार्ग तोचि ॥२१९।। स्वाध्याय स्तुति आनि स्तोत्र । जपजाप्य नौकारमंत्र । गुरूभक्ती श्रीजिनसूत्र । दानसुपात्र चतुर्विधा ।।२२०॥ पश्चिमेसी दिशा पवन । पर्वत देखिला नयन । वारूळ पंच हस्त प्रमाण । पाहे दुरून करकंडु ॥२२१।। तत् समयी ऐरावत तो । अभिषेक वारूळा करितो । कमळपुष्प त्या वाहतो । नमन करितो त्रिवार ।।२२२॥ येथे कारण काही आहे । चित्ती राजा विचारीताहे । वारूळाजवळ तो पाहे । काढोनी पाहे म्हणे राजा ॥२२३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org