________________
६८२ : आराधना-कथाकाष तो पाहोनिया रूपागळा । प्रौढ जाला यौवनकळा । आता करू लग्नसोहळा । द्रव्य पुष्कळा मेळउनी ॥३१॥ द्रव्यार्थी द्वीपांतरासी । नानारत्नादि द्रव्यरासी । मन इच्छित विभूतीसी । आले गृहासी पुण्याश्रय ।।३२।। तत् तस्य सुपुण्येन । राजा संतोषला पाहून । परम आदर करोन । पृथ्वीसुंदरी कन्यारत्न ।
रूपेन गुणशालिनी ।।३३।। सैवरा मंडप दिधले । सज्जन सोयरे मिळाले । विधियुक्त लग्न लावले । अर्धराज्य दिले अंदन ॥३४॥ राज्यविभूती होता थोर । बळा आगळा पृथ्वी विवर । हिंडता द्वीप देशांतर । कन्या सुंदर परनिल्या ॥३५।। राजकन्या श्रावकपुत्री । परनिल्या ते पुण्यसूत्री । प्रीतिकर राजा धरत्री । कुरंगनेत्री भानु जैसा ॥३६॥ एकसष्ठ स्त्रिया प्रनिल्या । सकळित सांगितल्या । श्रीमन् महापुराणी वणिल्या । विस्तारल्या बहुविभूती ॥३७।। अथ प्रीतिकरो राजा तदा । पावोनिया राज्यसंपदा । पुण्यभोगी सुखसंपदा । आनंदकंदा वृद्धीहेत ॥३८॥ सदा सुपात्रा दान देत । श्रद्धादि सप्त गुणान्वित । नवविध पुण्य जोडीत । शास्त्रयुक्त पुण्यपावन ।।३९।। पूजा न्हवन जिनदेवा । विधीयुक्तीन पुण्यठेवा । सप्तक्षेत्री देवाधिदेवा । द्रव्य ठेवा जीर्णोद्धारन ॥४०।। परोपकार यथायोग्य । दानधर्माय तथा योग्य । शास्त्रयुक्तिन स्वयं भाग्य । अनुराग भक्ति तत्पर ।।४१।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org