________________
प्रसंग अठ्ठेचाळीसावा : ६६३
श्लोक - श्रीमत् जैनपदांबुजेषु नितरां भृंगा पवित्राशया । सदृष्टिजिन शब्दपूर्वक मतिः शर्मप्रदा सा सती । नानावस्त्रसुवर्णरत्ननिकरैः देवादिभिः पूजिता । सदृष्टिजिनभक्तिनिश्चलमतिः कैकैर्न संपूज्यते ।।१११॥
॥ इति दर्शन कथा ११५ ॥
श्लोक - श्री जिनं त्रिजगद्देवं नमस्कृत्य सुराचितं । तं ब्रुवे सम्यक्त्वमाहात्म्यं चेलनाश्रेणिकाश्रितं ॥ ११२ ॥ श्रीजिन त्रिजगाचा देव । त्रिकाळवंदू देवाधिदेव । कथा सांगु सम्यक्त्ववैभव । श्रेणिकराव चेलनाते ।।११३।। मगध देश तो विख्यात । राजगृह नगर त्यात । राजा उपश्रेणिक तेथ । राणी गुणवंत सुप्रभा ।। ११४ ।। तत् पुत्र श्रेणिक सद्गुणी | पंचशतात शिरोमणी । धीर वीर गंभीर जनी । भोक्ता अग्रणी दाता च ।। ११५ ॥ एकदा पूर्व कृत वैर । नागधर्म तो राजेश्वर । श्रेणिका पाठवी नजर । अश्वकरभार पोश्याशी ।। ११६ ।। तेजी तुरंग व्योमगति । त्याची न कळे कोन्हा युक्ती । देता येईल तो मागुती केली युक्ती त्या वैरभावे ।। ११७ || उपश्रेणिक एके दिनि । अश्वारूढ फेरी मेदनी । बाग वोदिता चाले गगनी । निबिड वनी पडला तो ।। ११८ ।।
Jain Education International
त्या वनी असे वनपति । यमदंड यमाकृती ।
विद्युन्मती स्त्री रूपवती । पुत्री गुणवंती तिलका ॥ ११९ ॥ उपश्रेणिक पाहे तियसी । मदनव्याकुळ मानसी । भिल्लमामा हे द्या मजशी । शुभलग्नासी करा मामा ।। १२० ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org